Feng Shui : घराच्या भितींवर कधीच लावू नका हे चार फोटो, घरातील सुख, शांतीला लागेल ग्रहण

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईनुसार असे काही फोटो असतात, जे घरात लावल्यास त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा घरातील कुटुंबप्रमुखासह सर्वच सदस्यांवर होतो, आज आपण अशाच काही फोटोंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांना घरात लावणं अशुभ माण्यात आलं आहे.

Feng Shui : घराच्या भितींवर कधीच लावू नका हे चार फोटो, घरातील सुख, शांतीला लागेल ग्रहण
feng shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 05, 2026 | 10:05 PM

फेंग शुई हे चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईनुसार तुमच्या घरात ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तूंचा तुमच्यावर नकारात्मक किंवा सकारात्मक असा परिणाम होत असतो. काही वस्तू, प्राणी किंवा झाडं अशी असतात ज्यामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा तुम्हाला विविध अडचणी येऊ शकतात. जसं की घरात आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, घरात पैसा टिकत नाही, व्यावसायामध्ये तोटा होतो. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून ऊर्जा संतुलन साधण्यासाठी या प्रकारच्या गोष्टी घरात न ठेवण्याचा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. असे काही फोटो देखील असतात, ते घरात न ठेवण्याचा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. या फोटोंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आज आपण अशाच काही फोटोंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मावळत्या सूर्याचा फोटो – फेंग शुई शास्त्रामध्ये मावळत्या सूर्याच्या फोटो अशुभ माण्यात आलं आहे. मावळत्या सूर्याचा फोटो घरात न लावण्याचा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. फेंग शुई शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मावळत्या सूर्याचा फोटो घरात लावता तेव्हा तुमचं मन अस्वस्थ होतं. एवढंच नाही तर आर्थिक समस्या देखील निर्माण होतात. व्यावसायामध्ये तोटा होण्याची शक्यता असते.

तीन सदस्यांचा फोटो – फेंग शुईनुसार कुटुंबातील तीन सदस्यांचा फोटो घरात कधीही लावू नये, हे अशुभ माण्यात आलं आहे, जर घरात तीन सदस्य एकत्र असलेला फोटो लावला तर त्याचा कुटुंबातील सदस्यांच्या नात्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. घरात वादविवाद होतात. त्यामुळे घरात कधीही तीन सदस्य एकत्र असलेला फोटो लावू नये, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

वाहात्या पाण्याचा फोटो – घरात कधीही वाहात्या पाण्याचा फोटो लावू नये, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे, यामुळे हातात पैसा टिकत नाही.

काटेरी वनस्पतींचा फोटो – फेंग शुईनुसार घरात कधीही काटेरी वनस्पतींचा फोटो लावू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us