Feng Shui : हे फोटो घरात कधीच नसावेत, आयुष्य उद्ध्वस्त होईल, फेंग शुईशास्त्र काय सांगतं?

फेंग शुई शास्त्र हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये काही प्रतिमांना अशुभ माण्यात आलं आहे. असे फोटो, प्रतिमा या कधीही तुमच्या घरात असू नये, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे. या फोटोंचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो, असा दावा देखील करण्यात आला आहे.

Feng Shui : हे फोटो घरात कधीच नसावेत, आयुष्य उद्ध्वस्त होईल, फेंग शुईशास्त्र काय सांगतं?
feng shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 8:46 PM

फेंग शुई हे चिनी वास्तुशास्त्र आहे. या वास्तुशास्त्राचा उगम हा चीनमध्ये झाला. मात्र त्यानंतर संपूर्ण जगभरात याचा प्रसार झाला. फेंग शुई हे सर्वसाधारणपणे दोन तत्वावर काम करते, एक म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि दुसरं नकारात्मक ऊर्जा. फेंग शुईनुसार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. फेंग शुई नुसार काही फोटो देखील असे असतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे असे फोटो घरात किंवा ऑफिसमध्ये लावू नयेत. आज आपण अशाच काही फोटोंबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, असा दावा फेंग शुईमध्ये करण्यात आला आहे. असे फोटो घरात न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मावळत्या सूर्याचा फोटो – फेंग शुईनुसार घरात कधीही मावळत्या सूर्याचा फोटो लावू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तसेच तुमच्या महत्त्वांच्या कामांना देखील विलंब होतो. हातात घेतलेली कामं पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होतात. तसेच आर्थिक समस्या देखील निर्माण होतात, त्यामुळे घरात कधीही मावळत्या सूर्याचा फोटो लावू नये, त्याऐवजी उगवत्या सूर्याचा फोटो लावावा, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

Loading...

युद्धाचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही युद्धाचे फोटो लावू नयेत. कारण यामुळे घराचं वातावरण बिघडतं. घरामध्ये कोणतंही कारण नसताना भांडणं सुरू होतात. वादविवाद वाढतात. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांसोबत पटत नाही, त्यामुळे घरात कधीही युद्धाचे प्रसंग असलेले फोटो, तसेच ज्या फोटोमध्ये हिंसा असेल असे फोटो लावू नयेत, असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.

हिंस्र प्राण्यांचे फोटो – फेंग शुईनुसार घरात कधीही हिंस्र प्राण्यांचे फोटो लावू नयेत. जसं की वाघ, सिंह आणि इतर प्राणी. यामुळे घरातील शांतता नष्ट होते. घरात वादविवाद वाढतात. नकारात्मक ऊर्जा वाढते, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us