Feng Shui : धन प्राप्तीसाठी फेंग शुईमधील तीन सर्वात सोपे उपाय, घरावर होईल पैशांचा वर्षाव

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. ज्या प्रमाणे वास्तुशास्त्र आहे, तसंच फेंग शुई शास्त्र देखील आहे. सुरुवातीला हे शास्त्र फक्त चीनमध्येच परिचित होतं. परंतु काळाच्या ओघात आता फेंग शुई आणि त्यामध्ये सांगितले गेलेले उपाय हे जगभरात पोहोचले आहेत.

Feng Shui : धन प्राप्तीसाठी फेंग शुईमधील तीन सर्वात सोपे उपाय, घरावर होईल पैशांचा वर्षाव
Feng Shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 9:02 PM

जेव्हा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. या ऊर्जेच्या असंतुलनामुळे तुमच्या आयुष्यात अचानक समस्या निर्माण होण्यास सुरुवात होतात. जसं की सगळं सुरळीत सुरू असताना मध्येच अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, आणि त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होतं. अनेकदा असं देखील होतं की एखादा व्यक्ती पैसे कमावण्यासाठी दिवस रात्र प्रचंड कष्ट करतो, परंतु त्याला त्यामध्ये यश यश नाही. काही न काही तरी अडचणी येतच राहतात. तसेच समजा पैसा कमावला जरी तरी तो हातात. टिकत नाही. आर्थिक मार्गातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी चीनी वास्तुशास्त्र असलेल्या फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. काही विशिष्ट झाडं, मूर्ती या फेंग शुईमध्ये शुभ माण्यात आल्या असून, त्या घरात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चला तर मग या उपायांबद्दल माहिती जाणून घेऊयात.

जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, तुम्ही दिवस रात्र मेहनत करत आहात, पैसे कमवत आहात परंतु हातात आलेला पैसा लगेच खर्च होत आहे. पैशांची बचत होत नाही, तर यासाठी फेंग शुईमध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तो म्हणजे तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर कासवाची मूर्ती ठेवू शकतात. कासवाला स्थिरता आणि प्रगतीचं प्रतिक माण्यात आलं आहे, या उपायामुळे धनामध्ये वृद्धी होते, तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षाठ ठेवावी, ती म्हणजे कासवाचं तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असावं.

हत्तीची मूर्ती – हत्तीला ताकद, पैसा आणि सुख समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात हत्तीची मूर्ती ठेवू शकता. यामुळे तुमच्या आर्थिक मार्गातील सर्व अडथळे दूर होतात, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

तीन पायाचा बेडूक – फेंग शुई शास्त्रामध्ये बेडकाला शुभ मानलं जातं, त्यामुळे घरात तीन पायाच्या बेडकाची मूर्ती ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तुमचे सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us