Milk and Oil Spills: घरात वारंवार दूध आणि तेल पडणं शुभ कि अशुभ? काय सांगते वास्तूशास्त्र ते जाणून घ्या

वास्तुशास्त्रात बरेच नियम सांगितले गेले आहेत. त्यात काही चुकाही अधोरेखित केल्या गेल्या आहेत. घरात चुकून दूध पडणं शुभ मानलं गेलं आहे. तर तेल पडणं अशुभ असतं. असं का ते जाणून घेऊयात...

Milk and Oil Spills: घरात वारंवार दूध आणि तेल पडणं शुभ कि अशुभ? काय सांगते वास्तूशास्त्र ते जाणून घ्या
Milk and Oil Spills: घरात वारंवार दूध आणि तेल पडणं शुभ कि अशुभ? काय सांगते वास्तूशास्त्र ते जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 04, 2026 | 5:56 PM

Shani Effects Oil Spill: वास्तूशास्त्रानुसार घरात बऱ्याच गोष्टींची मांडणी केली जाते. दिशा आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास करून वस्तू ठेवल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? या व्यतिरिक्त घरात घडणाऱ्या गोष्टींचाही परिणाम होत असतो. घरात दूध आणि तेल पडण्याबाबतही शुभ अशुभ गणित मांडलं गेलं आहे. प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. बसवराज गुरूजी यांनी घरात दूध आणि तेल पडण्याचे संकेत सांगितले आहे. घरात दूध आणि तेल सांडलं तर त्याबाबत जुनी जाणती लोकं आपआपल्या पद्धतीने अंदाज बांधतात. हिंदू मान्यतांनुसार, वारंवार दूध आणि तेल सांडणं हे काही चांगले संकेत नसतात. यामागचं वास्तूशास्त्रीय कारण काय आहे ते समजून घेऊयात..

दूध सांडलं तर काय?

ज्योतिषी डॉ. बसवराज यांच्या मते, हिंदू धर्मात दूध पवित्र, समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. काही शुभ प्रसंगी दूध ऊतू देण्याची प्रथा आहे. नव्या जीवनाची सुरूवात आणि घरातील समृद्धीचे संकेत मानले जातात. पण चुकून किंवा वारंवार दूध पडलं तर त्याचेही शुभ परिणाम मिळतात. घरात समृद्धी, दैवी आणि ग्रहीय शक्तीत वाढ आणि चांगल्या नशिबाचे आगमन झाल्याचे यातून संकेत मिळतात. दूध हे चंद्राचं प्रतीक आहे. भगवान विष्णूंची तुमच्यावर कृपा असल्याचं यातून संकेत असतात. विष्णू स्थिरतेची देवता असल्याने शांती, स्थिरता, समृद्धी, आर्थिक सुबत्ता, उत्तम आरोग्य, व्यवसायात आणि कामात प्रगती, तसेच वैवाहिक बाबतीत शुभ वार्ता मिळण्याचे संकेत आहेत. पण हे शुभ परिणाम फक्त दूध अपघाताने सांडल्यासच लागू होतात, हेतुपुरस्सर सांडल्यास नाही.

तेल सांडणं अशुभ मानलं जातं

घरात वारंवार तेल सांडणं हे अशुभ मानलं जातं. मग ते स्वंयपाक घरात वापरणारं तेल असो की केसाला लावणारं तेल.. हिंदू शास्त्रानुसार, तेल हे शनीचं प्रतीक आहे. सांडलेले तेल घरात किंवा व्यक्तीच्या जीवनात वाईट स्थितीचे संकेत देतात. कर्ज, अर्थिक अडचणी, आजारपण आणि कौटुंबिक वाद याचे संकेत असू शकतात. एकंदरीत हा सामना राहण्याचा इशारा देखील असू शकतो. वारंवार तेल सांडत असल्यास शनिदेवाच्या मंदिरात दिवा लावून प्रार्थना करावी. यामुळे शनि ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होतो.

Follow Us