नटखट कान्हाचं भन्नाट रुप! पाहता क्षणी म्हणाल वाह, ही क्रिएटिव्हिटी पाहून नेटकरी झाले फिदा, व्हायरल Video पाहिलात का?

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णाच्या मनमोहक रुपाची भुरळ अबालवृद्धाला आहे. कृष्णाच्या नटखट बाललिल्लांनी आजही समाजमनावर मोठं गारूड घातलं आहे. आज कृष्णजन्माष्टमीनिमित्त अनेक लहान मुलं कृष्णाच्या रुपात सजली आहे. पण अशी क्रिएटिव्हिटी तुम्ही अद्याप पाहिलेली नसेल. हे दृश्य पाहिल्यावर तुमच्या तोंडून आपसूकच वाह निघेल.

नटखट कान्हाचं भन्नाट रुप! पाहता क्षणी म्हणाल वाह, ही क्रिएटिव्हिटी पाहून नेटकरी झाले फिदा, व्हायरल Video पाहिलात का?
कृष्ण जन्माष्टमी
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 04, 2026 | 12:55 PM

श्रीकृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक श्रद्धेने साजरी होत आहे. श्रीकृष्णाचे बाललिलांचे गारूड संपूर्ण भारतीय समाजमनावर आरूढ आहे. नटखट कान्हा, डोक्यावरील मोरपिस, हातात बासरी आणि चेहऱ्यावरील गोड हास्य. असा गोडूला श्रीकृष्ण सर्वांच्याच मनात घर करतो. या जन्माष्टमीला अनेक आयांनी त्यांच्या मुला-मुलींनी बाळकृष्णाच्या रुपात सजवलं आहे. त्यातही काहींनी अत्यंत सर्जनशीलता दाखवली आहे. भन्नाट कल्पना लढवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

इंटरनेटवर बाळकृष्णाची मोहिनी

देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव ओसंडून वाहत आहे. दहीहंडी, गोपाल काल्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर त्याचवेळी नटखट रुपातील बालगोपाळांचा सोशल मीडियावर महापूर आला आहे. अनेक आयांनी आपल्या लाडक्या कृष्णाची छबी सोशल मीडियावर अपलोड केली आहे. इंटरनेटवर ऐकापेक्षा एक सुंदर आणि कल्पक व्हिडिओंनी मोहिनी घातली आहे. एका युझरने शेअर केलेल्या या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

नेटकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक

ट्विटरवर @sathyashrii या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओतील श्रीकृष्णाने अनेकांना मोहित केले आहे. हा बालकृष्ण पाहता क्षणीच तुमच्या तोंडून वाह असाच शब्द निघेल. श्रीकृष्णाचे हे मनमोहक रुप तुमच्या मनात घर करेल. या व्हिडिओत कृष्ण जन्मानंतर वासुदेव हे त्यांना घेऊन यमुना नदी पार करतानाचा प्रसंग चितारलेला आहे. कंसाच्या कारागृहातून मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाला एका टोपलीत ठेवत वासुदेव त्यांना डोक्यावर घेतात आणि यशोदा आणि नंद यांच्याकडे घेऊन जातात. वाटेत मुसळधार पावसाने यमुनेला महापूर आलेला असतो. पण श्रीकृष्णाचे पाय लागताच दुथडी भरून वाहणारी यमुना त्यांना वाट मोकळी करून देते. श्रीकृष्णाला पाऊस लागू नये यासाठी शेषनाग संरक्षण देतो असा हा प्रसंग आहे.

हा प्रसंग चितारण्यासाठी खास कल्पना लढवली आहे. या मनमोहक श्रीकृष्णाच्या डोक्याला आकर्षक रंगाच्या कापडाची गुंडाळी आहे. त्यात मोरपिस खोवलेला आहे. तर टोपली आणि त्याला एक कागदाचे वासुदेवाचे चित्र चिकटवण्यात आलेले आहे. पाठीमागून शेषनाग आहे. हा खास सेटअपच तयार करण्यात आलेला आहे. तो त्या मुलाला एखाद्या पोशाखासारखा परिधान करायला लावलेला आहे. यामुळे जणू वासुदेवच श्रीकृष्णाला आपल्या डोक्यावर घेऊन जात आहेत आणि शेषनाग हे त्यांचे संरक्षण करत आहे असा भास होतो.

या क्रिएटिव्हिटीला नेटकऱ्यांनी 10 पैकी 10 गुण दिलेले आहे. अनेकांनी या हौसी कलाकृतीचे तोंडभरून कौतुक केले आहे. डिजिटल युगात सणांचा अनोखा रंग यामुळे समोर आला आहे. या क्रिएटिव्हीने नवा ट्रेंड रुढ होत आहे आणि त्याचे किती कौतुक करू आणि किती नाही असं होतं असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us