लक्ष्मी नारायण योग… 26 सप्टेंबरपासून 6 राशींसाठी सुवर्णकाळ, फळफळणार नशीब

लवकरच लक्ष्मी नारायण योग येणार असून, त्याचा सहा राशींना मोठा फायदा होणार आहे. 26 सप्टेंबरपासून 6 राशींसाठी सुवर्णकाळ सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या राशींचं नशीब फळफळणार आहे.

लक्ष्मी नारायण योग... 26 सप्टेंबरपासून 6 राशींसाठी सुवर्णकाळ, फळफळणार नशीब
| Updated on: Sep 22, 2026 | 4:16 PM

ग्रहांचं संक्रमण झाल्यानंतर त्याचे चांगले वाईट परिणार आपल्या राशींवर होताना दिसतात. याचे परिणाम चांगले किंवा वाईट देखील असू शकतात. या संक्रमनाचे चांगले वाईट परिणाम राशींवर होत असतात, अशात 26 सप्टेंबर पासून काही राशींचे चांगले दिवस येतील असं सांगितलं जात आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शुक्र यांची युती नेहमीच अत्यंत शुभ मानली जाते, कारण त्यामुळे लक्ष्मी-नारायण योग निर्माण होतो. यामुळे धन, समृद्धी, यश आणि आनंद प्राप्त होतो. द्रिक पंचांगानुसार, 26 सप्टेंबर रोजी बुध शुक्राच्या राशीत, म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे शुक्र आधीपासूनच आहे. यामुळे बुध-शुक्र युती होईल, ज्यामुळे एक अत्यंत लाभदायक लक्ष्मी-नारायण योग निर्माण होईल.

वृश्चिक : वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या आर्थिक समस्या सोडवतील. जे कार्यरत आहेत त्यांना संधी किंवा जबाबदारी मिळू शकते. तुमचे आयुष्य एका नवीन दिशेने वाटचाल करेल. तुम्ही ज्या अनेक चांगल्या बदलांची बऱ्याच काळापासून वाट पाहत आहात, ते घडून येतील.

सिंह : सिंह राशीच्या लोकांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक जीवनातील व्यक्तींना आदर आणि सन्मान मिळू शकतो. त्यांना व्यवसायात नफा दिसेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. पण कोणताही निर्णय करण्यापूर्वी विचार नक्की करा.

कन्या : कन्या राशीच्या व्यक्तींचे संवाद कौशल्य सुधारेल. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळावा, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यावसायिक बैठका आणि व्यवहारांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

तूळ : तूळ राशीच्या व्यक्तींना यामुळे मोठे फायदे मिळतील. त्यांना दुसऱ्यांना दिलेले पैसे परत मिळतील आणि नवीन मालमत्ता खरेदी करता येईल. त्यांचं एखादं स्वप्न साकार होऊ शकतं. अविवाहित व्यक्तींना त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळू शकेल. करिअरमध्ये प्रगती आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे.

मकर : हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले करेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना चांगले परिणाम दिसू शकतात.

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us