चंद्राचं कर्क राशीच गोचर, या तीन राशींसाठी धोक्याची घंटा, सावधगिरी बाळला…

चंद्राचं गोचर राशीती प्रवेश धोक्याचं असेल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, या तीन राशींसाठी हे गोचर धोक्याची घंटा असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. तर त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे... तर जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगत आहे.

चंद्राचं कर्क राशीच गोचर, या तीन राशींसाठी धोक्याची घंटा, सावधगिरी बाळला...
| Updated on: Sep 23, 2026 | 9:30 AM

ग्रहमानचा परिणार राशींवर होत असतो. आता चंद्राचं कर्क राशीच गोचर होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा नऊ ग्रहांपैकी सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे. तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. कर्क राशीचा स्वामी असलेला चंद्र, मनाचा घटक मानला जातो. जेव्हा चंद्राची स्थिती बदलते, तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर लक्षणीयरीत्या परिणाम करतो. आता 21 सप्टेंबर रोजी चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. तो 23 सप्टेंबरपर्यंत या राशीत राहील. या मकर राशीचा स्वामी शनी आहे. चंद्र शनीच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे, त्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात दिसून येईल.

जरी काही राशींसाठी हा काळ चांगला असला तरी, काही राशींना या काळात त्यांच्या जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः, त्यांना कामाच्या ठिकाणी दबाव, खर्चात वाढ, मानसिक गोंधळ इत्यादींचा सामना करावा लागू शकतो. तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी…

मिथुन : चंद्राच्या गोचरामुळे मिथुन राशीच्या लोकांना अडचणी येतील. जीवनात अनपेक्षित आणि अचानक बदल घडतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. खर्च अचानक वाढू देखील शकतो. पैशाच्या बाबतीत तुम्ही अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. पैशाचे व्यवहार करताना तुम्हाला अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. इतरांच्या गोष्टींवरून वाद घालणं टाळा. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा.

सिंह : चंद्र सिंह राशीच्या सहाव्या घरात प्रवेश केला आहे. यामुळे या राशींना कामाच्या ठिकाणी शत्रू वाढण्याचं कारण मिळेल. तुम्हाला अनपेक्षित खर्चांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या. तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करा.

कुंभ : जे नोकरी करतात त्यांना कामाचा मोठा भार जाणवू शकतो. यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. पैशासंबंधी निर्णय घेताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. या काळात महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. काही गोष्टींमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ देखील होऊ शकता.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us