Durga Puja 2026: वेश्यालयातील मातीशिवाय दुर्गा देवीची मूर्ती अपूर्ण? काय आहे या अनोख्या परंपरेमागचं रहस्य?

Durga Puja 2026: नवरात्री असल्यामुळे देशात सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. सर्वांचं लक्ष देवीच्या मुर्तीने वेधलं आहे. पण फार कमी लोकांना माहिती की, देवी दुर्गेची मु्र्ती बनवण्यासाठी वेश्यालयातील माती वापरली जाते. तर जाणून घ्या पंरपरेमागचं रहस्य...

Durga Puja 2026: वेश्यालयातील मातीशिवाय दुर्गा देवीची मूर्ती अपूर्ण? काय आहे या अनोख्या परंपरेमागचं रहस्य?
Durga Puja
| Updated on: Oct 12, 2026 | 2:07 PM

Durga Puja 2026: देशात सर्वत्र नवरात्रीची धूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र देवीची पूजाअर्चा सुरु आहे. पण विशेषतः बंगाल, ओडिशा आणि आसाम यांसारख्या भागात दुर्गा पूजेचं एक वेगळंच वातावरण असतं, सर्वत्र भक्तीमय वातावरण असतं. दु्र्गा पूजेचा उत्सव नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सुरु होतो. या काळात विविध पूजा मंडप उभारले जातात, जिथे देवी दुर्गाच्या सुंदर मूर्तींची पूजा आणि सजावट केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा सोहळा मानला जातो… या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेची मुर्ती खास आकर्षण असतं… सांगायचं झालं तर, देवी दुर्गेची मूर्ती घडवण्यासाठी पाच किंवा अगदी दहा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा वापर केला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मूर्ती तयार करण्यासाठी वेश्यालयांच्या अंगणातील माती वापरण्याचीही एक परंपरा आहे. पण असं का केलं जातं? याबद्दल फार कोणाला माहिती नसेल… तर जाणून घ्या असं का केलं जातं…

देवी दुर्गेची मुर्ती बनवण्यासाठी वेश्यालयच्या मातीचा होतो वापर…

Loading...

पौराणिक कथांनुसार, एक वेश्या देवी दुर्गेची निस्सीम भक्त होती; परंतु समाजात तिला ज्या तिरस्काराला आणि अपमानाला सामोरं जावं लागलं, त्यामुळे ती अत्यंत दुःखी व निराश झाली होती. तिच्या या निखळ श्रद्धा आणि भक्तीने प्रसन्न होऊन देवी दुर्गाने तिला वर दिला आणि घोषित केले की, “जोपर्यंत माझ्या मूर्तीची निर्मिती करताना वेश्येच्या अंगणातील मातीचा वापर केला जाणार नाही, तोपर्यंत मी त्या मूर्तीत वास करणार नाही.”

एवढंच नाही तर, देवी दुर्गेच्या मूर्तींमध्ये वेश्यालयाच्या मातीच्या वापरामागे अनेक धार्मिक आणि पौराणिक आहेत. यातील एक प्रमुख मान्यता अशी आहे की, जेव्हा एखादा पुरुष एखाद्या वेश्यालयात प्रवेश करतो, तेव्हा तो आपली सर्व पवित्रता, पुण्य आणि गुण त्या ठिकाणाच्या उंबरठ्याबाहेर सोडून देतो. तिथून परतताना मात्र तो आपल्यासोबत पापाचं ओझं घेऊन येतो. म्हणूनच, वेश्यालयाच्या उंबरठ्याबाहेरची माती पवित्र मानली जाते.

विशेषतः वेश्यांच्या घराबाहेरची माती अनेक पुरुषांच्या पुण्याने भरलेली मानली जाते. याच कारणामुळे, या मातीचा वापर देवी दुर्गेच्या मूर्तींमध्ये केला जातो. याला देवीची शक्ती आणि करुणेचं प्रतीक देखील मानलं जातं, कारण देवी दुर्गा पवित्रता आणि खऱ्या भक्तीच्या माध्यमातून कोणतंही पाप आणि दोष शुद्ध करू शकतं.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us