Pitru Paksha Muhurt 2026: ‘श्राद्ध’ दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी का करत नाही? असं का ते पाहा…

Pitru Paksha 2026: आपण अनेकदा कोणतेही शुभ कार्य असो, यज्ञ असो, चांगले काम करायचे असो...सकाळीच आटोपून घेतो. मात्र जेव्हा मृत व्यक्तीचे श्राद्ध करायचे असल्यास दुपारची वेळच का निवडली जाते? 

Pitru Paksha Muhurt 2026: श्राद्ध दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी का करत नाही? असं का ते पाहा...
| Updated on: Sep 27, 2026 | 10:27 AM

Pitru Paksha 2026: आपण अनेकदा कोणतेही शुभ कार्य असो, यज्ञ असो, चांगले काम करायचे असो…सकाळीच आटोपून घेतो. मात्र जेव्हा मृत व्यक्तीचे श्राद्ध करायचे असल्यास दुपारची वेळच का निवडली जाते?  असा प्रश्न सर्वांनाच पडतो? आता  वैदिक पंचांगानुसार, 26 सप्टेंबर 2026 पासून पितृपक्षाला सुरूवात झाली. पितृपक्षात आपल्या पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याची परंपरा ही हिंदू धर्मात करतात. पण अनेकदा एक प्रश्न उपस्थित होतो की, जर देवी-देवतांची पूजा हे सकाळी आणि संध्याकाळी केले जात असेल, तर श्राद्ध दुपारी का केले जाते? यामागचे शास्त्रीय कारण काय ते जाणून घ्या..

सकाळच्या मुहुर्ताला शुभ न मानता दुपारच्या मुहुर्ताला शूभ का मानलं जाते?

वैदिक पंचांगानुसार, 26 सप्टेंबर 2026 रोजी भाद्रपद पौर्णिमा श्राद्धाने पितृपक्षाचा पंधरवडा सुरू झालाय. पुढील 15 ते 16 दिवस, प्रत्येकजण आपल्या पूर्वजांच्या शांती, समाधान आणि समृद्धीसाठी तर्पण आणि पिंडदान करेल.  धार्मिक श्रद्धेनुसार, श्राद्ध विधी हे पूर्वजांना समर्पित असलेल्या विधींशी संबंधित आहेत. त्यामुळे, या विधींसाठी दिवसाची अशी वेळ निवडली जाते, जी शास्त्रीय परंपरेनुसार पितृ कर्मांसाठी योग्य ठरते. याच कारणामुळे, सामान्य पूजेप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी करण्याऐवजी, श्राद्ध विधी प्रामुख्याने दुपारीच केल्या जातात.  वैदिक पंचांगानुसार, पितृ पक्षाच्या श्राद्धादरम्यान, कुतुप मुहूर्त आणि रोहिणी मुहूर्त, तसेच त्यानंतरची दुपार ही श्राद्धासाठी शुभ ठरली जाते. त्यानंतर इतर विधी केले.

सकाळी श्राद्ध करता येत नाही का?

धार्मिक मान्यतेनुसार, श्राद्ध विधींसाठी कुतुप, रोहिणी आणि दुपारच्या वेळेलाच विशेष महत्त्व आहे तुलनेने दुपारच्या वेळेला.

कुतुप आणि रोहिणी मुहूर्त म्हणजे काय?

धार्मिक मान्यतेनुसार,  कुतुप आणि रोहिणी मुहूर्त हे दिवसातील विशेष वेळा मानल्या जातात. कुतुप मुहूर्त दुपारी सुरु होतो, त्यानंतर रोहिणी मुहूर्त आणि मग दुपारची वेळ येते.

आज २७ सप्टेंबर २०२६ रोजी प्रतिपदा श्राद्धाचा मुहूर्त

कुतुप मुहूर्त: दुपारी १२:०१ ते १२:४९

रौहिण मुहूर्त: दुपारी १२:४९ ते १:३७

अपराह्न काळ: दुपारी १:३७ ते ४:०२

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us