Relationship Tips : घरात सतत वाद होतायेत, आचार्य चाणक्य म्हणतात, ‘हे’ 5 उपाय करून पहाच

Relationship Tips : आजच्या व्यस्त वेळापत्रकात एकच प्रश्न उपस्थित राहतो आणि तो म्हणजे, सतत होणारे वाद... अशात दोन्ही बाजूंनी काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे... यावर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 5 उपाय करु घ्या...

Relationship Tips : घरात सतत वाद होतायेत, आचार्य चाणक्य म्हणतात, हे 5 उपाय करून पहाच
| Updated on: Sep 29, 2026 | 10:11 AM

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. परंतु अनेक लोक विविध कारणांमुळे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असतात. ज्या कारणांना मागे काही मोठं कारण देखील नसतं. आचार्य चाणक्य हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्वानांपैकी एक आहेत. त्यांच्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात त्यांनी मानवी जीवन, मूल्ये आणि नातेसंबंधांवर अत्यंत मौल्यवान सल्ला दिला आहे. त्यांनी विशेषतः वैवाहिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्या सोडवण्याचे मार्ग सांगितले आहेत. त्यामुळे जाणून घ्या, चाणक्य नीतीमधील ते 5 महत्त्वाचे नियम कोणते आहेत, जे परस्पर विश्वास निर्माण करण्यास आणि कौटुंबिक सुख टिकवून ठेवण्यास मदत करतात.

चाणक्य म्हणतात की पती-पत्नीच्या नात्यात प्रेमासोबतच चांगली मैत्रीही असायला हवी. जेव्हा नात्यात मोकळेपणा असतो, तेव्हा माणूस कोणत्याही भीती किंवा संकोचाशिवाय आपल्या मनातले बोलू शकतो. मैत्री म्हणजे केवळ एकत्र चालणं किंवा हसणं नव्हे, तर आपल्या जोडीदाराचे विचार शांतपणे ऐकून घेणं आणि समजून घेणं हेसुद्धा आहे. जेव्हा जोडपे चांगले मित्र बनतात, तेव्हा मोठा गैरसमजसुद्धा सहजपणे दूर होऊ शकतो.

Loading...

कोणतंही नाते टिकण्यासाठी परस्पर आदर आवश्यक असतो. दोन भिन्न व्यक्तींचे विचार वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. परंतु जेव्हा मतांतर होतं, तेव्हा आपल्या जोडीदाराला कमी लेखू नका किंवा त्याची चेष्टा करू नका. इतरांसमोर आपल्या जोडीदाराची चेष्टा केल्याने आणि त्यांच्या मतांना फेटाळल्याने नात्यात दुरावा निर्माण होईल.

विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही, त्याला वेळ लागतो. चाणक्य यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, खोटेपणा हा कोणत्याही नात्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. गोष्टी लपवल्याने आणि अगदी क्षुल्लक बाबींवर खोटे बोलल्याने तुमच्या जोडीदाराच्या मनात संशयाचे बीज पेरले जाते. म्हणून तुमच्या नात्यात नेहमी पारदर्शक राहा. मोकळेपणा आणि प्रामाणिकपणामुळे गैरसमज दूर होतात आणि परस्पर विश्वास वाढतो.

वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या दोन व्यक्तींच्या आवडीनिवडी आणि विचार करण्याची पद्धत सारखी असेलच असं नाही. मते भिन्न असली तरी, आपल्या जोडीदाराच्या मतांचा आदर करा. आपल्या आवडीनिवडी आणि मते जोडीदारावर न लादता, दोघांनाही मान्य होईल असा एक समान निर्णय घेणं हाच शहाणपणाचा मार्ग आहे. आयुष्यात चढ-उतार येतच राहतात. नात्याची खरी परीक्षा कठीण काळातच होते. जेव्हा संकटं येतात, तेव्हा आपण एकमेकांना दोष देण्याऐवजी उपाय शोधण्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us