Cheek Moles Meaning: तुमच्या गालावर आहे तीळ, कसं असतं अशा लोकांचं भविष्य?

Cheek Moles Meaning: ज्यांच्या गालावर तीळ असतो ते लोक अत्यंत आकर्षक दिसतात... असं म्हणतात. पण ज्यांच्या गालावर तीळ असतं, त्यांचं भविष्य फार चांगलं असतं असं म्हणतात. तर जाणून घ्या शास्त्र काय सांगतं...

Cheek Moles Meaning: तुमच्या गालावर आहे तीळ, कसं असतं अशा लोकांचं भविष्य?
| Updated on: Sep 11, 2026 | 3:36 PM

Cheek Moles Meaning : शास्त्रामध्ये अनेक गोष्टींचं महत्त्व सांगितलं आहे. शास्त्रात असं देखील सांगितलं आहे की, गालावर असलेलं तीळ फार लाभदायक असतं. असं म्हटलं जातं की, ज्यांच्या गालावर तीळ असतो ते लोक अत्यंत आकर्षक दिसतात. गालावरील तीळ केवळ शारीरिक सौंदर्याच्या दृष्टीनेच नाही, तर ‘समुद्रिक शास्त्रा’नुसारही विशेष महत्त्व बाळगतो. हा तीळ केवळ चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व, सौंदर्य आणि भविष्य यांबद्दलची माहितीही देतो. आता जाणून घ्या की, समुद्रिक शास्त्रानुसार, गालावर तीळ असणं खरोखरच शुभ आहे का, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या…

समुद्रिक शास्त्रानुसार, गालावर तीळ असणं हे अत्यंत शुभ आणि भाग्यशाली लक्षण मानलं जातं. अशा व्यक्तींना आयुष्यात सहजपणे यश मिळतं आणि चांगल्या संधी प्राप्त होतात. त्यांना कधीही धनसंपत्तीची कमतरता भासत नाही. एवढंच नाही तर, ते सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतात. ज्योतिषांच्या मते, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना नशिबाची साथ मिळते. पुरुषाच्या उजव्या गालावर आणि स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असणे विशेष शुभ मानलं जातं.

अशा लोकांचा स्वभाव उत्तम असतो…

ज्यांच्या गालावर तीळ असतो, असे लोक स्वभावाने सौम्य, साधे आणि प्रेमळ असतात. ते जिथे जातात तिथे आपल्या बोलण्याच्या शैलीने, हास्याने आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने सर्वांचं मन जिंकून घेतात; तसेच समाजात त्यांना विशेष आदर आणि ओळख मिळते. ‘समुद्रिक शास्त्रा’नुसार, अशा व्यक्तींमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि जिद्द असते. ते हाती घेतलेलं कोणतेही काम पूर्ण करून यश मिळेपर्यंत सातत्याने प्रयत्न करत राहतात; त्यांच्यात आव्हानांचा धैर्याने सामना करण्याचा गुण असतो.

तीळ सौभाग्य, सुंदरता आणि समृद्धीचं प्रतीक…

गालावर तीळ असणं देवाच्या कृपाचं प्रतीक मानलं जातं… ते केवळ आपल्या वागणुकीने सर्वांचं प्रेमच जिंकत नाहीत, तर आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातही प्रचंड प्रगती करतात. थोडक्यात सांगायचं तर, गालावर तीळ असणं हे काही अशुभ लक्षण नाही; उलट, ते सौभाग्य, सौंदर्य, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि समृद्धी यांचे शुभ प्रतीक मानलं जातं.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us