Shardiya Navratri 2026: नवरात्री सुरु होण्यापूर्वी ‘या’ वस्तू घरातून काढून टाका, नाहीतर…

Shardiya Navratri 2026: गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी अनेकांची तयारी देखील सुरु झाली आहे. तर त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट करण्यास विसरु नका. नवरात्री सुरु होण्यापूर्वी घरातून काही वस्तू काढून टाका. तर कोणत्या आहेत, त्या वस्तू जाणून घ्या...

Shardiya Navratri 2026: नवरात्री सुरु होण्यापूर्वी या वस्तू घरातून काढून टाका, नाहीतर...
| Updated on: Sep 26, 2026 | 10:01 AM

Shardiya Navratri 2026: 14 सप्टेंबर रोजी आगमन झालेल्या गणरायाचं शुक्रवारी विसर्जन झालं. आता प्रत्येकाला नवरात्रीची प्रतिक्षा आहे. नवरात्रीला अनेकांना गरब्याची उत्सुकता असते. पण नवरात्री आधी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. 11 ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. पण वास्तूनुसार नवरात्रीचा पवित्र सण सुरू होण्यापूर्वी घरातून कोणत्या वस्तू काढून टाकल्या पाहिजेत, हे जाणून घेऊया. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्री सुरू होण्यापूर्वी घर स्वच्छ करण्याचीही एक परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, स्वच्छ आणि नीटनेटके घर सकारात्मक वातावरण निर्माण करतं. वास्तुशास्त्राशी संबंधित श्रद्धेनुसार, घरात अशा कोणत्याही वस्तू ठेवू नयेत असंही सांगितलं जात आहे. यामध्ये तुटलेल्या, खराब झालेल्या किंवा न वापरलेल्या वस्तूंचा समावेश आहे. अशात जाणून घ्या घरातून कोणत्या वस्तू काढून टाकल्या पाहिजे..

तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो : नवरात्रीपूर्वी घरात ठेवलेल्या देवदेवतांच्या मूर्ती आणि फोटो तुटलेले असल्यास किंवा फोटो खराब झाला असल्यास, ते पूजास्थळावरून काढून टाकावेत. धार्मिक मान्यतेनुसार, तुटलेली मूर्ती पूजास्थळी ठेवणे योग्य मानले जात नाही.

तुटलेली विद्युत उपकरणे : घरात एखादा जुना मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, घड्याळ, चार्जर किंवा इतर विद्युत उपकरण पडून असू शकतं, जे बऱ्याच काळापासून खराब झालेले आहेत आणि वापरले जात नाही. वास्तूनुसार, अशा अशुभ वस्तू घरात ठेवू नयेत.

फुटलेली काचेची भांडी : घरात फुटलेल्या काचेच्या वस्तू, कप, प्लेट्स, आरसे किंवा फुटलेली भांडी असतील तर नवरात्रीपूर्वी त्या काढून टाकाव्यात. वास्तूशास्त्रानुसार घरात फुटलेल्या वस्तू ठेवणं योग्य मानलं जात नाही. त्यामुळे, साफसफाई करताना अशा वस्तू वेगळ्या करून सुरक्षितपणे बाहेर काढल्या पाहिजेत.

तुटलेल्या चपला : कधीकधी घरात जुन्या किंवा तुटलेल्या चपला देखील असतात. यासाठी नवरात्रीपूर्वी घरातून तुटलेल्या चपला किंवा बूट काढून टाकावेत. वास्तूनुसार, निरुपयोगी तुटलेल्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा आणतात.

वाळलेल्या वनस्पती : घरात झाडे ठेवणं सकारात्मक वातावरणासाठी चांगलं मानलं जातं. परंतु, एखादे रोप पूर्णपणे सुकलेलं असेल, तर ते घरात जास्त काळ ठेवू नये. नवरात्रीपूर्वी घरातील कुंड्यांमधून सुकलेली झाडे काढून टाकावीत. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीपूर्वी घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवून शुभ वातावरण निर्माण करण्याची परंपरा आहे.

(डिस्क्लेमर: सदर बातमीतील माहिती ज्योतिषशास्त्रीय गृहीतकांवर आधारित आहे. आम्ही यातील दाव्यांची पुष्टी करत नाही किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us