Surya Gochar 2026 : 17 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्याचं कन्या राशीत गोचर, 12 राशींवर काय होणार परिणाम ?
Sun Transit 2026 Date : 17 सप्टेंबरला सूर्यदेव सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या संक्रमणाचा 12 राशींवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), ग्रह वेळोवेळी राशी बदलतात, याला ज्योतिषीय भाषेत ग्रहांचे गोचर म्हणतात. येत्या 17 सप्टेंबरला सूर्यदेव सिंह राशीतून (Sun Transit) कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. वैदिक ज्योतिषामध्ये सूर्यदेव हा आत्मविश्वास, मान-सन्मान, अधिकार, सरकारशी संबंधित कामं आणि समाजाताली प्रतिष्ठेचे कारक मानलं जातं. तर कन्या राशीचा संबंध गोष्टींचं बारकाईने परीक्षण करणे, योग्य व्यवस्था निर्माण करणे, सेवा करणे आणि प्रत्येक काम उत्तम प्रकारे करण्याशी निगडीत आहे. या गोचरामुळे लोकांमध्ये आपल्या कामाप्रती लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती आणि शिस्त वाढते. बुधदेव आधीपासूनच कन्या राशीत विराजमान असल्यामुळे सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे संवाद, बुद्धिमत्ता, कागदोपत्री कामे, नियोजन आणि कार्यालयीन निर्णयांवर विशेष भर राहील.
मेष राशी – सूर्य तुमच्या राशीपासून सहाव्या भावातून भ्रमण करेल. हा काळ स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी, कामाच्या ठिकाणची आव्हाने पेलण्यासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. जो लोकं नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नवी संधी मिळेल. कामातील अडथळे दूर करून आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी तुमचा दृढनिश्चय असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा पूर्ण लाभ मिळेल.
वृषभ राशी – सूर्य तुमच्या राशीपासून पाचव्या भावातू भ्रमण करेल, यामुळे शिक्षण, कला, बुद्धि आणि लहान मुलांशी निगडीत बळ मिळेल. विद्यार्थ्यांचा त्यांच्या क्षमतेवरील विश्वास वाढेल, कला क्षेत्राशी निगडीत लोकांना मान-सन्मान मिळू शकतो. तुम्ही पैशांशी निगडीत निर्णय अतिशय काळजीपूर्वक आणि नीट विचार करून घ्या.
मिथुन राशी – सूर्यदेव तुमच्या राशीच्या चौथ्या भावातून गोचर करणार. त्यामुळे घर, जमीन-जुमला, वाहन आणि कुटुंबाशी संबंधित विषय अधिक महत्त्वाचे ठरतील. जमीन-जुमल्याशी संबंधित कामांमध्ये किंवा घर अधिक चांगले करण्याच्या योजना पुढे सरकू शकतात. तर जे नोकरी करतात त्यांना त्यांच्या कामात स्थिरता मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
कर्क राशी – सूर्यदेव तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावातून गोचर करतील. ही स्थिती धाडस, संवाद, नवीन संपर्क आणि स्वतःहून पुढाकार घेण्यासाठी खूप चांगली ठरेल. परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही स्वतःहून पावलं उचलण्यासाठी तयार असाल. जे लोक विक्री, मीडियात, तसेच लेखन-वाचनाचं काम आणि व्यवसायातील नवीन संपर्कांशी संबंधित आहेत, त्यांना या काळाचा लाभ घेता येईल.
सिंह राशी – सूर्यदेव तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावातून गोचर करतील. त्यामुळे धन, बचत, कुटुंब आणि तुमच्या वाणीवर विशेष लक्ष असेल. तुम्ही तुमचे पैसे व्यवस्थित ठेवण्याचे आणि बचत मजबूत करण्याचे चांगले मार्ग शोधाल. व्यावसायिक उत्पन्न आणि जबाबदाऱ्यांमध्येही सुधारणा होऊ शकते. तुमच्या बोलण्याचा प्रभाव खूप जास्त असेल, त्यामुळे कोणाशीही कठोर किंवा कटू बोलणं टाळा.
कन्या राशी – सूर्यदेव तुमच्या राशीत म्हणजेच पहिल्या भावात प्रवेश करतील, हा एक अतिशय महत्त्वाचा गोचर आहे. तुमचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि दिशा ठरवण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. करिअरशी संबंधित बाबींना गती मिळण्याची शक्यता आहे. एखादी नवीन जबाबदारी किंवा पुढे येऊन नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला या काळात मिळू शकते. बुधदेवही कन्या राशीत असल्यामुळे या काळात विचारपूर्वक निर्णय घेणे आणि प्रभावी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
तूळ राशी – सूर्यदेव तुमच्या राशीच्या बाराव्या भावातून गोचर करतील. त्यामुळे परदेशाशी संबंधित संपर्क, प्रवास, खर्च आणि पडद्यामागील कामांकडे तुमचं लक्ष वाढेल. जे लोक परदेशी कंपन्यांसोबत काम करतात आहेत किंवा प्रवासाची योजना आखत असतील, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या पुढील व्यावसायिक पावलांची तयारी करण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे.
वृश्चिक राशी – सूर्यदेव तुमच्या राशीच्या अकराव्या भावातून गोचर करणार आहेत. त्यामुळे उत्पन्न आणि व्यावसायिक संपर्कांच्या दृष्टीने हा काळ सर्वोत्तम काळांपैकी एक ठरेल. तुमच्या कमाईत सुधारणा होऊ शकते आणि दीर्घकाळापासून अडकलेल्या पैशांशी संबंधित प्रकरणे पुढे सरकू लागतील. नवीन संपर्कांमुळे तुमच्यासाठी उपयुक्त मार्ग खुला होऊ शकेल. व्यावसायिकांची नवीन ग्राहक किंवा प्रभावशाली व्यक्तींशी भेट होऊ शकते.
धनु राशी – सूर्यदेव तुमच्या राशीच्या दहाव्या भावातून गोचर करतील. करिअरमध्ये प्रगती, अधिकार आणि मान-सन्मान मिळवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. ऑफीसमध्ये तुम्हाला अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा तुमचं व्यवस्थापन कौशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक हे आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या तुमच्या मेहनतीचे आता चांगले परिणाम दिसू लागतील.
मकर राशी – सूर्यदेव तुमच्या राशीच्या नवव्या भावातून गोचर करतील. यामुळे तुमचे भाग्य, उच्च शिक्षण, प्रवास, गुरुजन आणि जीवनाची योग्य दिशा अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मौल्यवान मार्गदर्शन मिळू शकते किंवा व्यावसायिक जीवनात एखादा नवीन मार्ग सापडू शकतो. प्रवास करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
कुंभ राशी – सूर्यदेव तुमच्या राशीच्या आठव्या भावातून गोचर करतील. हा गोचर थोडा सावधपणे पुढे जाण्याचा आहे. या काळात संयुक्त पैसा, कर, विमा, गुंतवणूक आणि अचानक होणारे बदल याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला तुमच्या आर्थिक करारांचे आणि व्यवहारांचे अतिशय काळजीपूर्वक पुनरावलोकन करावे लागू शकते. दुसरीकडे, संशोधन, तांत्रिक काम, विमा किंवा कर क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगली प्रगती मिळू शकते.
मीन राशी – सूर्यदेव तुमच्या राशीच्या सातव्या भावातून गोचर करतील. व्यवसायातील भागीदारी, ग्राहक, करार आणि जनतेशी संबंधित कामांवर तुमचे विशेष लक्ष राहील. व्यावसायिकांना नवीन ग्राहक भेटू शकतात किंवा नवीन भागीदारीची सुरुवात होऊ शकते. समाजातील तुमची प्रतिमा सुधारेल, मात्र नातेसंबंध सांभाळण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. दरवेळी बोलताना आपलंच खरं करण्याचा हट्ट टाळा, विशेषतः तुमच्या जोडीदारासमोर किंवा व्यावसायिक सहकाऱ्यांसमोर असं वागू नका. वाईट प्रतिमा तयार होऊ शकते.
(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)