Vastu Shastra : देवपूजा करताना तुम्ही तर या चुका करत नाहीत ना? जाणून घ्या काय करावं काय करू नये?

वास्तुशास्त्रामध्ये देवपूजा कशी करावी? याचे देखील काही नियम सांगितले आहेत. जर पूजा करताना नियमांचं पालन केलं गेलं नाही, काही चुका झाल्या तर घरात वास्तुदोष निर्माण होतो. आज आपण पूजेच्या विधीचे नियम जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : देवपूजा करताना तुम्ही तर या चुका करत नाहीत ना? जाणून घ्या काय करावं काय करू नये?
devghar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 06, 2026 | 7:57 PM

हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये देवाची पूजा कशी करावी? पूजेची योग्य पद्धत काय आहे? पूजा करताना काय करावे? काय करू नये याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपल्या घरावर नेहमी देवाचा आशीर्वाद राहावा, घरात सुख, शांती आणि समृद्धी रहावीत. आपल्यावर येणारी संकट टळावीत यासाठी सर्वजण देवाची पूजा करत असतात. मात्र पूजा करताना तुम्ही जर योग्य नियमांचं पालन केलं तर तुम्हाला त्या पूजेचं फळ मिळतं. मात्र पूजा करताना काही चुका झाल्या, तर अपेक्षित फळ आपल्याला मिळत नाही, उलट घरात वास्तुदोष तयार होतो. त्यामुळे आज आपण पूजा करताना पाळण्याच्या काही नियमांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार कोणत्या नं कोणत्या देवतेला समर्पित असतो, जसं की शनिवार हा शनिदेवांना समर्पित आहे. सोमवार महादेवांना समर्पित आहे, त्या दिवशी जर आपण या देवतांची पूजा केली, त्यांना काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्या तर देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की पूजा ही नेहमी ब्रह्म मुहूर्तावरच करावी. देवपूजेसाठी फार वेळ करू नये. सूर्योदयापूर्वी एखादा तास आधी केलेली पूजा ही खूपच शुभ मानली जाते. पूजा करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की कधीही तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला असू नये, पूजा करताना तुमचं तोंड हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच हवे. तसेच देवघराची दिशा देखील दक्षिण नसावी. देवघर हे जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर उत्तमच कारण ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली जाते.

काय करावं, काय करू नये?

तुमचं देवघर हे कधीही किचन वट्याच्या अगदी जवळ किंवा बेडरूममध्ये असू नये. तुमच्या देवघरात कधीही तुमच्या पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत. तसेच तुमच्या घरात जे देवी देवतांच्या मूर्ती आहेत, त्या जास्त उंच असू नये, त्यांची सरासरी उंची ही दोन फुटांपर्यंतच असावी. देवघरात पूजाचं साहित्याशिवाय इतर कोणत्याही वस्तू ठेवू नयेत. देवघरात कधीही काडेची पेटी ठेवू नये. देवांना जल अर्पण करताना नेहमी तांब्यांच्या पात्राचाच वापर करावा. देव पूजा करताना पुजेनंतर गंध आणि नैवेद्य या दोन गोष्टी कधीही विसरू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us