Vastu Shastra : हातात पैसा टिकत नाही? मग करा घराच्या मुख्य दरवाजाशी संबंधित हा एक सोपा उपाय, होईल पैशांचा वर्षाव
अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की हातात तर प्रचंड पैसा येते, मात्र पैसा जसा येतो, तसाच तो खर्च देखील होतो. पैसा हातात टिकत नाही, कोणत्या न कोणत्या कारणांमुळे खर्च होतो. असं घडू नये, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

काही लोकं हे आपल्या आयुष्यात प्रचंड कष्ट करतात, दिवस-रात्र काम करतात, परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. त्यासाठी वेगवेगळी कारणं कारणीभूत असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास जेव्हा तुमच्या घरात असलेली सकारात्मक ऊर्जा कमी होते, आणि नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुमच्याही घरात अशा समस्या निर्माण होत असतील, हातात पैसा टिकत नसेल, किंवा इतर काही समस्या असतील तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
घराचा मुख्य दरवाजा – वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य दरवाजाला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच बाहेरून येणारी ऊर्जा घरात येत असते. बाहेरून येणारी ऊर्जा ही कोणतीही असू शकते, ती सकारात्मक देखील असू शकते किंवा नकारात्मक देखील असू शकते. जेव्हा तुमच्या घरात नकारात्ममक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा त्याचा शुभ प्रभाव तुमच्यावर पडतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा या ऊर्जेसाठी एक फिल्टर म्हणून काम करतो. तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही सोपे उपाय केले तर सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या घराच्या बाहेरच नष्ट होईल, फक्त सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल. चला तर मग जाणून घेऊयात या उपायाबद्दल.
वास्तुशास्त्रानुसार दररोज नित्यनियमाने सकाळी अंघोळीनंतर एका स्वच्छ कापडाने तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा. ज्या पाण्याने तुम्ही दरवाजा पुसणार आहात, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, तसेच दरवाजा पुसून झाल्यानंतर दरवाजावर थोडं हळद आणि कुंकू देखील वाहायचं. हळदीमध्ये नकारात्मक शक्तीला मज्जाव करणारे गुणधर्म असतात. तसेच या उपायामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील सदैव तुमच्यावर राहतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)