Vastu Shastra : पितृदोषामुळे त्रस्त आहात? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यात कधी त्रास होणार नाही

जेव्हा एखाद्या व्यक्तीला पितृदोष असतो, तेव्हा संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात अचानक काही समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. जसं की, काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात, आर्थिक समस्या जाणवतात. पितृदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : पितृदोषामुळे  त्रस्त आहात? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यात कधी त्रास होणार नाही
Pitru Dosh
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 8:40 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. जेव्हा एखाद्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्या घरावर संकट येण्यास सुरुवात होते. तसेच पितृदोषाचं देखील आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, तेव्हा त्याला अनेक अडचणींचा समना करावा लागतो. जसं की सगळं सुरळीत सुरू असताना देखील, घरात सतत भांडणं होतात, त्यामुळे घर अस्थिर बनतं. कुटुंब प्रमुखाचं कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत पटत नाही. एवढंच नाही तर अचानक काही मोठ्या आर्थिक समस्या येतात, त्यामुळे तुमचं घर कोलमडण्याची शक्यता असते. पितृदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याचबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात, वास्तुशास्त्रामध्ये नेमके काय उपाय सांगण्यात आले आहेत? त्याबद्दल.

गायीला चारा – जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर अशा व्यक्तीने नित्यनियमाने दररोज गायीला एक भाकरी, पोळी किंवा हिरवा चारा खाऊ घालावा, घरी गाय पाळावी, गो मातेची सेवा करावी. जर घरात गाय पाळणं शक्य नसेल तर अशावेळी गो शाळेत जाऊन गो मातेची सेवा करावी, यामुळे पूर्वज प्रसन्न होतात. घरातील पितृदोष दूर होऊन, त्रास कमी होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. हिंधू धर्मामध्ये गायीला पवित्र मानलं जातं.

पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा – जर तुम्ही देखील पितृदोषामुळे त्रस्त असाल तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे दररोज तुम्हाला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला माराव्यात, यामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते. याच उपायासोबत वर्षातून एकदा तिथीनुसार तुमच्या पूर्वजांचं श्राद्ध आणि पक्ष हे दोन विधी करावेत.

तुळशीजवळ दिवा – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात पितृदोष असेल किंवा अन्य कोणताही दोष असेल तर अशावेळी सकाळ, संध्याकाळ नित्यनियमाने तुळशीजवळ दिवा लावावा. या उपायामुळे घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us