Vastu Tips: हातातून मीठ आण दूध सतत सांडतंय, हे शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं
Vastu Tips: वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही समजुतींनुसार दिवसात अनेक गोष्टी होत असतात, ज्यामागं अनेक कारणं दडलेली असतात. अनेकांच्या हातून सतत मीठ आणि दूध सांडत असतं, त्यामागे देखील वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या...

Vastu Tips: हिंदू धर्मात वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व आहे. शास्त्रात अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याबद्दल माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. वास्तूमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, मीठ आणि दुधाला देखील फार महत्त्व आहे. सांगायचं झालं तर, घरी काम करत असताना, कधीकधी हातातून अचानक काहीतरी खाली पडतं. कधी दुधाचा ग्लास निसटतो, तर कधी मिठाची बरणी हातातून पडते. अशा परिस्थितीत, तुम्हाला माहित आहे का, की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही समजुतींनुसार, दैनंदिन जीवनातील अशा लहान घटना विशेष चिन्हांशी जोडलेल्या असतात? वास्तु तज्ज्ञांच्या मते, हातातून काही महत्त्वाच्या वस्तू वारंवार खाली पडणं अशुभ मानलं जातं तर, येथे जाणून घ्या की हातातून कोणत्या वस्तू पडणं अशुभ आहे आणि त्यामागे काय समजुती आहेत.
हिंदू धर्मात पूजेदरम्यान दिवा लावण्याला एक विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत, पूजा किंवा आरती करताना दिवा हातातून पडल्यास ते अशुभ मानलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार, हे येणाऱ्या काळात घरात काही अडचणी किंवा आर्थिक संकट येण्याचे लक्षण मानलं जातं. मात्री, याला कोणत्याही मोठ्या संकटाचे निश्चित चिन्ह मानू नये.
स्वयंपाक करताना किंवा मीठची बरणी उचलताना मीठ जमिनीवर पडणं ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, मीठ हे शुक्र आणि चंद्राशी संबंधित मानलं जातं. असं मानलं जातं की हातातून वारंवार मीठ पडणं हे घरातील आर्थिक समस्या किंवा कुटुंबातील सदस्यांमधील मतभेदांचं लक्षण असू शकते. याच कारणामुळे, अनेक वडीलधारी मंडळी मीठ काळजीपूर्वक साठवण्याचा सल्ला देतात.
दूध गरम करताना लक्ष विचलित झाल्यास ते स्टोव्हवर सांडणं ही एक सामान्य गोष्ट आहे. तथापि, ज्योतिषशास्त्रानुसार, दूध हे चंद्राचं कारक मानलं जातं. म्हणूनच, वारंवार दूध सांडणं हे घरातील अशांतता किंवा पैशाशी संबंधित समस्यांचे लक्षण मानलं जातं.
पूजा करताना हातातून ताट पडल्यास किंवा त्यात ठेवलेली फुले, कुंकू आणि अक्षता जमिनीवर सांडल्यास लोकांना स्वाभाविकपणे काळजी वाटते. धार्मिक श्रद्धेनुसार, पूजेचं साहित्य अशा प्रकारे पडणे अशुभ मानले जाते. काही समजुतींनुसार, हे कुटुंबात संभाव्य विसंवादाचे लक्षण मानलं जातं. परंतु अशी घटना घडल्यावर घाबरून जाण्याऐवजी, शांतपणे साहित्य गोळा करावे, देवाची क्षमा मागावी आणि पूजा पूर्ण करावी.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)