Vastu Tips : घरात या प्राण्यांची मुर्ती ठेवल्याने बनतो धनलाभाचा योग, ही आहे योग्य दिशा

| Updated on: May 18, 2023 | 2:17 PM

असे म्हणतात की प्रत्येक प्राणी कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतो, त्यामुळे त्याच्याशी संबंधित ग्रह घरावरही परिणाम करतात. वास्तुशास्त्रात (Vastu Tips) काही प्राण्याची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते.

Vastu Tips : घरात या प्राण्यांची मुर्ती ठेवल्याने बनतो धनलाभाचा योग, ही आहे योग्य दिशा
वास्तूशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : अनेकदा लोकं घरात सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ठेवतात. बहुतेक लोकं घरात देवाची मूर्ती ठेवतात पण काही लोकं घरात प्राण्यांचीही मूर्ती ठेवतात. असे म्हणतात की प्रत्येक प्राणी कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतो, त्यामुळे त्याच्याशी संबंधित ग्रह घरावरही परिणाम करतात. वास्तुशास्त्रात (Vastu Tips) काही प्राण्याची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यासोबतच घराची आर्थिक स्थितीही सुधारते. चला जाणून घेऊया कोणत्या प्राण्याची मूर्ती ठेवण्याचे काय फायदे होतात.

हत्तींची जोडी

वास्तुशास्त्रानुसार हत्तीची जोडी घरात ठेवणे शुभ मानले जाते. घरात हत्तीची जोडी ठेवल्याने कुटुंबात एकता टिकून राहते. यासोबतच वैवाहिक जीवन आनंदी राहते. वास्तूनुसार घरात चांदीचा किंवा पितळेचा हत्ती ठेवणे खूप शुभ असते.

कासव

कासव हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरात कासव असते, त्या घरात देवी लक्ष्मीचाही वास असतो. घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला कासव ठेवल्यास धनाची प्राप्ती होते.

हे सुद्धा वाचा

हंसांची जोडी

वास्तुशास्त्रानुसार ड्रॉईंग रूम किंवा बेडरूममध्ये दोन हंसांचे चित्र लावणे चांगले मानले जाते. असे म्हणतात की यामुळे पती-पत्नीचे वैवाहिक जीवन सुधारते. यासोबतच घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.

मासे

वास्तुशास्त्रानुसार मासे संपत्ती आणि उर्जेचे प्रतीक मानले जाते. घरात पितळ किंवा चांदीचा मासा ठेवल्याने सुख-समृद्धी येते. यासोबत संपत्ती येते. घराच्या उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते.

गाय

शास्त्रानुसार गायीमध्ये सर्व देवी-देवता वास करतात असे मानले जाते. म्हणूनच गाईची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख, समृद्धी येते.

उंट

घरात उंटाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. उंट हे संघर्ष आणि यशाचे प्रतीक आहे. घराच्या ड्रॉईंग रूम किंवा लिव्हिंग रूमच्या उत्तर-पश्चिम दिशेला ठेवल्याने करिअर किंवा व्यवसायात यश मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)