सावध व्हा…, तुमच्या घरात घडतायेत ‘या’ तीन गोष्टी… मोठं संकट येण्याची शक्यता!

जीवनात सर्वकाही आनंदी सुरु असताना मध्येच असं काही घडतं, ज्यामुळे नक्की काय घडतंय काहीही कळत नाही. पण त्याआधी येणारे संकेत तुम्हााला ओळखता आले पाहिजे... तर 'या' तीन गोष्टी तुमच्या घरात घडत असतील तर, आजच सावध व्हा...

सावध व्हा..., तुमच्या घरात घडतायेत या तीन गोष्टी... मोठं संकट येण्याची शक्यता!
| Updated on: Mar 08, 2026 | 2:27 PM

हिंदू धर्मात अनेक गोष्टी शास्त्रानुसार केल्या जातात. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण मुहुर्त पाहून करतो… अशात ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व सांगतलेलं आहे. वास्तुशास्त्र अनेक गोष्टींबद्दल माहिती दडलेली आहे. असेही म्हटले जाते की, तुमच्या घरात होणारे काही बदल तुम्हाला येणाऱ्या समस्यांबद्दल सांगतील. पण काही समस्य अशा देखील असतात, ज्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो… काही लोक अनेक समस्यांनी त्रस्त असतात. विशेषतः अनेक लोक आर्थिक आणि आरोग्य समस्यांनी त्रस्त असतात. काही लोक सतत कर्जाच्या सापळ्यात अडकलेले असतात. परंतु अशा समस्या उद्भवण्यापूर्वी काही चिन्हे दिसतात. ती उर्जेचा प्रवाह रोखतात. विशेषतः जर ही तीन चिन्हे दिसली तर असे म्हटले जाते की घरावर दुर्दैव येणार आहे.

जर तुम्ही एखाद्या भांड्यात तेल ओतत असाल आणि ते घसरून खाली पडले किंवा तेल खाली पडले तर ते दुर्दैवाचे लक्षण आहे. हे खूप अशुभ आहे. तेलाचा संबंध शनि ग्रहाशी आहे. म्हणून, तेल खाली पडल्याने तुमचा आर्थिक प्रवाह रोखला जाईल. त्याशिवाय, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील. तुमची प्रगती थांबण्याचीही ही एक चिन्हे आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचं देखील मोठं महत्त्व सांगितलेले आहे… घरात तुळशीचे रोप वाळणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. त्याशिवाय, त्यामुळे घरातील प्रत्येक कुआलाची ऊर्जा वाढते. म्हणूनच या काळात खूप काळजी घेतली पाहिजे. तुळशी बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असल्याने ती घरात शांती आणते. पण जर ती सुकली तर याचा अर्थ घरात अशुभ संभावना आहे.

घराच्या छतावर मृत पक्षी दिसणे देखील चांगले नाही. हे शनि किंवा राहू आणि केतुच्या प्रभावाचे संकेत देते. यामुळे घरात आरोग्य समस्या, मानसिक अशांतता आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात. जेव्हा अशी चिन्हे दिसतात तेव्हा घर मिठाच्या पाण्याने पुसून दररोज पूजा करावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us