Last Panchak: आजपासून सुरू हाेताेय वर्षाचा शेवटचा पंचक, चुकूनही करू नका ‘या’ गाेष्टी

| Updated on: Dec 27, 2022 | 9:19 AM

उत्तराभाद्रपद आणि पूर्वाभाद्रपदाच्या तिसर्‍या पदावरून चंद्र भ्रमण करताे तेव्हा पंचक (Panchak) तिथी सुरू होते.

Last Panchak: आजपासून सुरू हाेताेय वर्षाचा शेवटचा पंचक, चुकूनही करू नका या गाेष्टी
पंचक नियम
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत जातो तेव्हा पंचक तिथी सुरू होते. तसेच, धनिष्‍ठ नक्षत्र, शतभिषा नक्षत्र, रेवती नक्षत्र, उत्तराभाद्रपद आणि पूर्वाभाद्रपदाच्या तिसर्‍या पदावरून चंद्र भ्रमण करताे तेव्हा पंचक (Panchak) तिथी सुरू होते. मंगळवारी लागणारा पंचक अग्नि पंचक (Agni Panchak) म्हणून ओळखला जातो. अग्नि पंचक अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार पंचकमध्ये कोणतेही शुभ कार्य होत नाही. यावेळी पंचक आजपासून म्हणजेच 27 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पंचक 5 दिवस असते. जाणून घेऊया पंचकबद्दलचे काही विशेष नियम.

पंचक काळ

प्रत्येक महिन्यात पंचकचे पाच दिवस असतात. हिंदू पंचांगानुसार, यावेळी मंगळवार, 27 डिसेंबर 2022 रोजी पंचक पहाटे 03:31 वाजता सुरू होईल आणि शनिवार, 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11:47 वाजता समाप्त होईल. यावेळी अग्निपंचक होणार आहे.

पंचक काळात काय करू नये

  1.  पंचक काळात लाकूड विकत घ्यायचे नाही आणि घरात लाकूड गोळा करायचे नाही. तसेच, लाकडापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करू नका किंवा बनवू नका.
  2.  पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे. मान्यतेनुसार ही दिशा यमराजाची दिशा मानली जाते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. पंचक काळात घराचे बांधकाम करू नये आणि घरात कोणताही कंदील लावू नये.
  5. शुभ कार्य करू नये. पंचक दरम्यान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर मृत व्यक्तीच्या मृतदेहासोबत पिठाच्या पाच पुतळ्या ठेवाव्यात असे मानले जाते. असे केल्याने पंचक दोष नाहीसा होतो.
  6.  पंचक दरम्यान लाकडी पलंग खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते.

पंचकचे खास उपाय

  1. पंचक दरम्यान काही कारणास्तव तुम्हाला दक्षिणेची यात्रा करावी लागत असेल तर हनुमान मंदिरात 5 फळे अर्पण करून यात्रा करा.
  2. जर घरात लग्न जवळ आलं असेल आणि वेळेची कमतरता असेल तर लाकडी वस्तू खरेदी करणे आवश्यक असेल तर गायत्री हवन करून लाकडी फर्निचर खरेदी करू शकता.
  3. या दिवसांत घराचे छत बसवणे आवश्यक असल्यास अशा वेळी मजुरांना मिठाई खाऊ घालावी आणि नंतर छत घालण्याचे काम करा.
  4. पंचकमध्ये इंधन गोळा करणे आवश्यक असल्यास, भगवान शिवाच्या मंदिरात पंचमुखी दिवा (पिठाचा बनलेला, तेलाने भरलेला) लावा, नंतर इंधन खरेदी करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)