पुजेच्या वेळी का लावला जातो कपाळावर टिळा, धार्मिकच नाही तर शास्त्रीय कारणही जाणून घ्या

यासोबतच पूजेदरम्यान देवतांना तिलकभिषेकही (Importance Of Tilak) केला जातो. हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही याचे अनेक फायदे आहेत.

पुजेच्या वेळी का लावला जातो कपाळावर टिळा, धार्मिकच नाही तर शास्त्रीय कारणही जाणून घ्या
टिळा लावण्याचे महत्त्व
Image Credit source: Social Media
| Updated on: May 30, 2023 | 5:24 PM

मुंबई : हिंदू धर्मात अनेक परंपरा आहेत ज्या शतकानुशतके पाळल्या जात आहेत. यामध्ये मोठ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे, शंख फुंकणे, अगरबत्ती लावणे यांचा समावेश आहे. हिंदू धर्मात टिळा लावल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी पूर्ण होत नाही.  यासोबतच पूजेदरम्यान देवतांना तिलकभिषेकही (Importance Of Tilak) केला जातो. हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही याचे अनेक फायदे आहेत. वास्तविक, रोजच्या पूजेच्या वेळी टिळा लावल्याने अनेक फायदे होतात. टिळा लावल्याने मन आणि मेंदू शांत राहतो. यासोबतच तुमचे सर्व लक्ष भगवंताच्या भक्तीमध्ये मग्न राहते. याशिवाय टिळा लावल्याने भगवंताचा आशीर्वाद मिळतो, त्यामुळे सर्व कार्य सहज सफल होतात.

जाणून घ्या कपाळावर टिळा लावण्याचे महत्त्व काय आहे?

धार्मिक शास्त्रांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, टिळक लावल्याने क्रोधित ग्रह शांत होण्यास आणि त्यांचे नकारात्मक प्रभाव दूर होण्यास मदत होते. मान्यतेनुसार, कपाळावर टिळा लावल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. अशा वेळी आपल्या श्रद्धा आणि उपासनेशी संबंधित हे तिलक लावल्याने नवग्रहांचे दोषही दूर होतात. असे मानले जाते की कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी टिळक लावावे. असे केल्याने कार्य सफल होते. यासोबतच आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात.

टिळा लावण्याची योग्य पद्धत कोणती?

पूजेच्या वेळी कोणत्याही देवी, देवता किंवा कुणालाही टिळा लावण्यासाठी नेहमी उजव्या हाताच्या अनामिकेचा वापर करावा. हिंदू परंपरेनुसार कोणत्याही देवतेला नेहमी उजव्या हाताच्या अनामिकेलेने टिळा लावावा. मध्यमा आणि तर्जनी अशुभ मानली जाते. अनामिकेने टिळा लावल्यास आपल्या मनात सकारात्मक विचार येतात असे मानले जाते. यासोबतच कोणत्याही व्यक्तीने पूर्व दिशेला उभे राहून टिळा लावावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)