Gautam Gambhir : ‘तू कितीही मोठा फलंदाज बनं, पण..’ कॅप्टन श्रेयस अय्यरबद्दल हेड कोच गौतम गंभीर यांचं विश्लेषण
Gautam Gambhir : वनडे मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आता भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पाच सामन्यांची टी 20 सीरीज सुरु होणार आहे. त्याआधी हेड कोच गौतम गंभीर यांनी कॅप्टन श्रेयस अय्यर बद्दल काही महत्वाची वक्तव्य केली आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पाच सामन्यांच्या टी 20 सीरीजला मंगळवार 6 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर पहिला सामना होणार आहे. या मॅच आधी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांनी कॅप्टन श्रेयस अय्यरचं कौतुक केलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून गोल्ड मेडल मिळवलं. सोशल मीडियावर मागच्या काही काळापासून गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर यांच्यात मतभेद आणि तणाव असल्याच्या बातम्या प्रकाशित होत आहेत. कोच गंभीर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. जिओस्टारशी बोलताना गंभीर यांनी 2024 मधील केकेआरमधले दिवस आठवले. श्रेयस सोबतचा त्यांचा काम करण्याचा अनुभव किती शानदार होता ते गंभीर यांनी सांगितलं. अय्यरच्या नेतृत्वाखाली 2024 साली केकेआरच्या टीमने टी20 ट्रॉफी उंचावली होती.
“2024 मध्ये मी केकेआरचा कोच बनलो, तो श्रेयस सोबत काम करण्याचा माझा पहिला अनुभव होता. श्रेयस अय्यर त्यावेळी केकेआरचा कॅप्टन होता” असं गंभीर यांनी अय्यरच कौतुक करताना सांगितलं. “अय्यर मधली सर्वात चांगली गोष्ट मला वाटली ती म्हणजे तो टीमसाठी आपली बॅटिंग पोजिशन सोडायला सुद्धा तयार असायचा. श्रेयस खूप फ्लेक्सिबल होता. टीमची गरज लक्षात घेऊन त्याच्याजागी दुसरा फलंदाज आधी उतरणार असेल तर त्यावर श्रेयसला कुठलाही आक्षेप नसायचा” असं गंभीर श्रेयसचं कौतुक करताना म्हणाले.
The joy of winning a first multi-national tournament as Captain 🏆
The pride of stepping up for the team as Vice-Captain! 🇮🇳🎥 𝙎𝙤𝙖𝙠𝙞𝙣𝙜 𝙞𝙣 𝙜𝙤𝙡𝙙𝙚𝙣 𝙜𝙡𝙤𝙧𝙮 𝙬𝙞𝙩𝙝 @ShreyasIyer15 and @TilakV9 🏅
🔽 Watch | #TeamIndia | #AsianGames
https://t.co/cLc51knLUk
— BCCI (@BCCI) October 4, 2026
श्रेयसमध्ये हा गुण भरलेला आहे
गौतम गंभीर यांच्या मते श्रेयस अय्यरमधला सर्वात मोठा गुण म्हणजे निस्वार्थी भावना. कुठलाही कॅप्टन किंवा चांगल्या लीडरमध्ये हा गुण सर्वात आधी पाहिजे. निस्वार्थी भावना हा चांगल्या लीडरमधला सर्वात महत्वाचा गुण आहे असं गौतम गंभीर यांनी सांगितलं. श्रेयसमध्ये हा गुण भरलेला आहे. त्याच्या कर्णधारपदासाठी हा एक प्लस पॉइंट आहे. “तुम्ही कितीही मेहनत करा, शिस्तबद्ध, फिट रहा किंवा क्रिकेट विश्वातील नंबर 1 फलंदाज जरी असलात, पण तुमच्यात निस्वार्थी भावना नसेल तर मग काही उपयोग नाही. श्रेयसमध्ये हे सर्व गुण आहेत” असं गंभीर म्हणाले.