अभिषेक शर्माशी लग्न, तर गिलसोबत हुक अप, अनाया बांगर श्रेयस बद्दल जे बोलली ते ऐकून हैराण व्हाल

Anaya Banagar Video: अनाया बांगरने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीची जोरदार चर्चा सुरु आहे कारण तिने अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरबद्दल मोठे विधान केले आहे.

अभिषेक शर्माशी लग्न, तर गिलसोबत हुक अप, अनाया बांगर श्रेयस बद्दल जे बोलली ते ऐकून हैराण व्हाल
| Updated on: Oct 19, 2026 | 10:46 AM

Anaya Bangar Video: माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरही नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच, तिची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका रॅपिड-फायर राऊंडदरम्यान अनायाला भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिने दिलेल्या उत्तरांची आता चर्चा सुरु आहे.

यावेळी अनायाला या तिन्ही क्रिकेटपटूंसाठी ‘किल’, ‘मॅरी’ आणि ‘हुक अप’ यापैकी एक पर्याय निवडायला सांगितले होते. हे पर्याय ऐकून अनाया थोडी गोंधळली, पण तिने हुशारीने निवड केली. तिने श्रेयस अय्यरला ‘किल’, अभिषेक शर्माला ‘मॅरी’ आणि शुभमन गिलला ‘हुक अप’ म्हणून निवडले. ‘कृष्णक आत्रे’ यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेला अनाया बांगरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Loading...

अनाया बांगरने लिंगबदल शस्त्रक्रिया केली आहे. अनाया होण्यापूर्वी तिचे नाव आर्यन होते. अनाया होण्यापूर्वी ती मुंबईसाठी पुरुषांच्या वयोगट क्रिकेटमध्ये खेळली होती. २०२२ मध्ये तिने आपले लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. आता प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे, ती तिची क्रिकेट कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची योजना आखत आहे.

ऑस्ट्रेलियाप्रमाणे महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी देण्याचा विचार करावा, असे अनायाने अलीकडेच बीसीसीआयला आवाहन केले आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना अनाया म्हणाली, “ऑस्ट्रेलियाने जे केले आहे, ते जर बीसीसीआयने केले, तर ती एक उत्तम सुरुवात होईल.” अनायाने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये गेली होती. अशी अपेक्षा आहे की, ती पुढील हंगामापासून महिला बिग बॅश लीगमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडू म्हणून खेळू शकेल.

अनाया बांगर ही मुंबईकडून क्रिकेट खेळायची. सर्फराज खान, यशस्वी जयस्वाल हे तिचे सहकारी खेळाडू होते, पण नंतर मात्र अनाया हा इतका बॉल्ड निर्णय घेतला. तिने थेट तिचे लिंग बदलले. लिंग जरी बदलले असले तरीही तिच्यातील क्रिकेटबद्दलची आत्मियता कमी झालेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us