Asia Cup Hockey 2022: भारताने इंडोनेशियाला चिरडलं, 16-0 ने मोठा विजय मिळवून सुपर फोरमध्ये प्रवेश

| Updated on: May 26, 2022 | 8:04 PM

भारतीय हॉकी संघाने आशिया कपच्या शेवटच्या साखळी सामन्यात इंडोनेशियाला धुळ चारली. भारताने तब्बल 16-0 ने इंडोनेशियावर मोठा विजय मिळवला.

Asia Cup Hockey 2022: भारताने इंडोनेशियाला चिरडलं, 16-0 ने मोठा विजय मिळवून सुपर फोरमध्ये प्रवेश
Asia cup hockey
Image Credit source: Photo credit hi
Follow us on

मुंबई: भारतीय हॉकी टीमने (India hockey Team) गुरुवारी दमदार खेळ दाखवला. शेवटच्या साखळी सामन्यात इंडोनेशियाला धुळ चारली. भारताने तब्बल 16-0 ने इंडोनेशियावर (India vs indonesia) मोठा विजय मिळवला. भारताने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात भारताला काहीही करुन विजय आवश्यक होता. तो ही 15-0 अशा गोल फरकाने विजय हवा होता. हे अत्यंत अवघड काम होतं. पण भारताच्या युवा हॉकीपटुंनी जे अशक्य वाटत होतं, ते शक्य करुन दाखवलं. त्यांनी मैदानावर गोलचा अक्षरक्ष: पाऊस पाडला. पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर जपानने भारताला 2-5 ने नमवलं होतं. त्यामुळे साखळीतच भारताला गाशा गुंडाळावा लागेल, अशी शक्यता निर्माण झाली होती.

भारताचा आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश

भारताने पहिल्या सत्रापासून इंडोनेशियावर दबाव टाकला होता. भारताच्या फॉरवर्ड खेळाडूंनी सातत्याने इंडोनेशियाच्या गोल क्षेत्रात हल्लाबोल केला. पहिल्या क्वार्टरमध्ये तीन गोल केले. यात दोन गोल पवन राजभरने केलं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये एसवी सुनीलने 19 व्या मिनिटाला चौथा गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला नीलम संजीपने पेनल्टी कॉर्नरवर गोल डागून भारताला 5-0 ने आघाडी मिळवून दिली. भारताने सातत्याने इंडोनेशियावर दबाव टाकून एकापाठोएक 16 गोल डागले. भारताने रेकॉर्ड आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानने सहा वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

पाकिस्तानने क्वालिफाय नाही केलं

पाकिस्तान 2023 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करु शकला नाही. जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे देश पात्र ठरले. भारत यजमान असल्याने क्वालिफाय झाला आहे.