आयसीसीच्या नियमानुसार शिव्या दिल्या म्हणून T20 वर्ल्डकप आधी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन फिंचला बाहेरचा रस्ता

| Updated on: Oct 12, 2022 | 6:51 AM

प्रत्येक टीम आपल्या खेळाडूला दुखापत आणि इतर गोष्टीपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे

आयसीसीच्या नियमानुसार शिव्या दिल्या म्हणून T20 वर्ल्डकप आधी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन फिंचला बाहेरचा रस्ता
Aaron-Finch
Image Credit source: instagram
Follow us on

ऑस्ट्रेलियात (Australia) होणारी टी 20 क्रिकेट स्पर्धा (T20 world Cup) काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे आत्तापासून खेळाडूंनी आपली मैदानातील रणनिती आखायला सुरुवात केली आहे. मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या टीम कसून सराव करीत आहेत. विशेष म्हणजे सराव सामन्यात सुद्धा संघर्ष पाहायला मिळत आहे. अनेक खेळाडू आपल्याकडून स्पर्धेच्या आगोदर कसल्याही प्रकारची चुकी होऊ नये याची काळजी घेत आहे. ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) याच्यावर मोठा आरोप करण्यात आला आहे.

प्रत्येक टीम आपल्या खेळाडूला दुखापत आणि इतर गोष्टीपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण विश्वचषक स्पर्धेला अधिक महत्त्व असल्याने, अनेक खेळाडू आपल्याला खूप दिवसांनी खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पुर्णपणे तयार झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन आरोन फिंच याच्यावर शिवी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याने शिवी दिल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला विश्वचषक स्पर्धा मुकावी लागते की काय अशी परिस्थिती आहे.

हे सुद्धा वाचा

स्टम्पच्या माईकमध्ये आरोन फिंच काय बोलला त्याचं रेकॉर्डिंग झालं आहे. तसेच बीसीसीआयचा आरोप आरोन फिंचने मान्य सुद्धा केला आहे. त्यामुळे आरोन फिंचवरती मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.