Hardik Pandya: …असं करा नाही तर घरी बसा, बीसीसीआयनं हार्दिक पंड्यासाठी चालवला हंटर, वॉर्निंग दिली
Hardik Pandya: हार्दिक पंड्या सध्या दुखापतीततून सावरत आहे, तो योग्य ती काळजी घेत आहे. फिटनेस चांगली ठेवण्यासाठी तो अथक पराक्रम करत आहे पण तरीही हार्दिक पंड्यासाठी बीसीसीआयने हंटर चालवला आहे.

आयपीएल संपल्यानंतर अफगाणिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली आणि दोन्ही टीममध्ये वनडे आणि टेस्ट मालिका पार पडल्या. यानंतर भारतीय टीम आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यावर आणि मग झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आणि मालिका पार पडल्या. पण या कोणत्याच संघात हार्दिक पंड्याचा समावेळ नव्हता.
आयपीएलमध्ये दुखापत झाल्यानंतर हार्दिकचा अजून काही कमबॅक झालेला नाही. हार्दिकच्या कमबॅकची सगळेच वाट पाहत आहे, भारतीय संघातही त्याची कमी भासत असताना बीसीसीआयच्या मनात काहीतरी वेगळेच असल्याचे पाहायला मिळत आहे.
वर्ल्ड कपच्या न्यूझीलंड दौरा होणार आहे. जो भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे, पण बीसीसीआय खेळाडूंच्या फिटनेसबाबत सध्या अलर्ट मोडवर गेली आहे. बीसीसीआयची एक बैठकही होणार आहे, या बैठकीत आता या मुद्यावर चर्चा रंगणार आहे.
हार्दिक तो फिट व्हावा यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे, तो बेंगळुरुमध्ये सेन्टर ऑफ एक्सिलेंसमध्ये घाम गाळत आहे, पण बीसीसीआयनुसार हार्दिकचा कमबॅक लांबेल किंवा होणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत.
टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीने हार्दिकसमोर अट ठेवली आहे. हार्दिकला वनडे टीममध्ये कमबॅक करायचं असेल आणि वनडे वर्ल्ड कप खेळायचा असेल तर त्याला पूर्ण 10 ओव्हर बॉलिंग टाकण्यासाठी जी फिटनेस आवश्यक आहे ती पूर्ण करावी लागेल.
फक्त बॅटिंगच्या जोरावर हार्दिकची 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये निवड होणार नाही, असं आता टीम मॅनेजमेंटने स्पष्ट केलं आहे. या संदर्भात बीसीसीआयची एक महत्त्वाची बैठक पार पडली.