Bhuvneshwar Kumar: याला म्हणतात Aura! भुवीने मैदानात पायही ठेवला नाही तरीही रेकॉडब्रेक कामगिरी करुन गेला

Bhuvneshwar Kumar Comeback: भुवनेश्वर कुमारची काल भारत आणि वेस्ट इंडिजच्या पाचव्या टी-२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली. निवड होताच त्याने एक रेकॉर्डब्रेक कामगिरी केली.

Bhuvneshwar Kumar: याला म्हणतात Aura! भुवीने मैदानात पायही ठेवला नाही तरीही रेकॉडब्रेक कामगिरी करुन गेला
| Updated on: Oct 18, 2026 | 10:41 AM

IND vs WI 5th T20 Match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेलेला मालिकेतील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सुरुवातीला, पावसामुळे खेळ थांबल्यानंतर सामना प्रत्येकी ९ षटकांचा होणार होता. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताला, ७.४ षटकांनंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने सामना रद्द करण्यास भाग पडले. चार वर्षांच्या खंडानंतर भुवनेश्वर कुमारने या सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन केले होते, परंतु सामना रद्द झाला. असे असूनही, भुवनेश्वर कुमारने एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भुवनेश्वर कुमारला अखेर खेळण्याची संधी मिळाली, पण पावसाने त्याच्या आशांवर पाणी फेरले. जेव्हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश करण्यात आला, तेव्हा तो सर्वाधिक सामने न खेळता कमबॅक करणाना भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी, एकूण १०४ सामने चुकवून खलील अहमद या यादीत अव्वल स्थानी होता. आपल्या शेवटच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर एकूण १०६ सामने न खेळता भुवनेश्वर कुमारने आपला पुढचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

Loading...

दोन टी२० सामन्यांच्या दरम्यान सर्वाधिक सामने चुकवणारे भारतीय खेळाडू:

भुवनेश्वर कुमार – १०६ टी२० सामने (नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२६)
खलील अहमद – १०४ टी२० सामने (नोव्हेंबर २०१९ ते जुलै २०२४)
वरुण चक्रवर्ती – ८६ टी२० सामने (नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२४)
संजू सॅमसन – ७३ टी२० सामने (जुलै २०१५ ते जानेवारी २०२०)
शिवम दुबे – ७० टी२० सामने (फेब्रुवारी २०२० ते ऑगस्ट २०२३)

वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका संपल्यानंतर, भारतीय संघ या फॉरमॅटमधील आपली पुढील मालिका २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांत खेळणार असून, भुवनेश्वर कुमारचाही संघात समावेश आहे. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडच्या दौऱ्यावर तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल, कारण तेथील परिस्थिती त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us