अरेरे पुन्हा नामुष्की, PCB अध्यक्षाचा पक्षपातीपणा, मित्राला न्याय, शाहीनला ठेंगा

| Updated on: Sep 25, 2022 | 8:17 PM

शाहीन आफ्रिदीच्या उपचारासाठी एकही रुपया खर्च न देणारं पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेटिझन्सच्या निशाण्यावर होतं. आता पुन्हा एकदा पीसीबीचा पक्षपातीपणा समोर आलाय. वाचा...

अरेरे पुन्हा नामुष्की, PCB अध्यक्षाचा पक्षपातीपणा, मित्राला न्याय, शाहीनला ठेंगा
पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : आधीच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर (Pakistan Cricket Board) नामुष्की ओढावलेली असताना पुन्हा एकदा पीसीबी (PCB) अडचणीत आलंय. याचं कारण खुद्द पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा आहेत. शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) प्रकरणात त्याच्या उपचारासाठी एकही रुपया खर्च न देणारं पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेटिझन्सच्या निशाण्यावर होतं. या प्रकरणावर जगभरातून टीका होऊ लागली. त्यानंतरही पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं बदनामी होऊ दिली पण खेळाडूच्या उपचासाठी पैसे काही दिले नाही. मात्र, पीसीबीच्या विद्यमान अध्यक्षांनी आता असं काही केलंय की त्यामुळे पीसीबीचा पक्षपातीपणा समोर आलाय.

मित्रा न्याय, शाहीनला ठेंगा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी त्यांचा मित्र आणि माजी सहकारी सकलेन मुश्ताकसाठी बोर्डाची तिजोरी उघडली आहे. त्यांनी त्याच्या गुडघ्याच्या उपचारासाठी 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे पीसीबीचा पक्षपातीपणा समोर आलाय.

निष्काळजीपणाचा आरोप

49 कसोटी आणि 169 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 496 विकेट घेणार्‍या सकलेन मुश्ताकची कारकीर्दही गुडघ्याच्या दुखापतीमुळे जवळपास संपली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शाहीन शाह आफ्रिदी आशिया कपमधून बाहेर पडला.

शाहीनची स्वखर्चानं शस्त्रक्रिया

वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या गुडघ्यावर लंडनमध्ये स्वखर्चानं शस्त्रक्रिया करण्यात आली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं या संदर्भात खुलासा केला आणि पीसीबीला टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

रमीझ राजा निशाण्यावर

मित्राला तात्काळ पैसे दिल्यानंतर रमीझ राजा अडचणीत आले आहेत. मुश्ताक गेल्या काही काळापासून गुडघ्याच्या त्रासानं त्रस्त असून राष्ट्रीय संघाचे डॉक्टर नजीब सोमरो यांनी त्यांना उपचारासाठी दहा लाख रुपये देण्याची विनंती केली होती.

कधी मागणी करण्यात आली

पाकिस्तान संघ एकदिवसीय मालिकेसाठी नेदरलँड दौऱ्यावर असताना मुश्ताककडून दहा लाख रकमेची मागणी करण्यात आली होती. तिथेही त्याला काही उपचार घ्यावे लागले.