Anaya Bangar : उंच, दणकट आणि… अनाया बांगरचा ड्रीम पार्टनरबाबतचा पहिल्यांदाच खुलासा; सोशल मीडियावर चर्चा

माजी क्रिकेटपटू Sanjay Bangar यांची मुलगी Anaya Bangar पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कॉमेडियन Pranit More यांच्या शोमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिने आपली सेक्श्युअल ओरिएंटेशन स्ट्रेट असल्याचे सांगत, तिला पुरुष आवडतात असे स्पष्ट केले.

Anaya Bangar : उंच, दणकट आणि... अनाया बांगरचा ड्रीम पार्टनरबाबतचा पहिल्यांदाच खुलासा; सोशल मीडियावर चर्चा
anaya bangar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2026 | 5:39 PM

अनाया बांगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेच्या स्टँड अप शोमध्ये ती सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या व्यक्तिगत आयुष्य आणि नात्याचे पदर उलगडवून दाखवले. तसेच तिने तिच्या सेक्शुअल ओरिएंटेशनबाबतही मोठा खुलासा केला. मला पुरुष पसंत आहेत. आणि मी स्ट्रेट आहे, असं अनायाने म्हटलं आहे. अनाया तिच्या या नव्या स्टेटमेंटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. त्यातच तिने क्रिकेटर्स फ्लर्ट करत असल्याचं सांगितलं आहे. म्हणजे या वेगळ्या झेंगाटाने तिला प्रचंड त्रास होत असल्याचं तिने नमूद केलं आहे.

अनायाने तिच्यात झालेल्या बदलानंतरच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मला पुरुषांमध्ये इंटरेस्ट आहे. माझी सेक्श्युअल ओरिएंटेशन स्ट्रेट आहे, असं तिने सांगितलं. अनायाच्या या बिनधास्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिचे फॅन्स तिच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

कसला पुरुष हवा…

यावेळी तिने तिला कोणत्या प्रकारचा पार्टनर हवा आहे, यावरही भाष्य केला. प्रणित मोरेने तिला विचारलं की, तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? त्यावर तिने आतापर्यंत कोणीच नाही, असं उत्तर दिलं. पण माझ्या आयुष्यातही कोणी तरी यावं, असं तिने स्पष्ट केलं. तिने तिच्या आयडियल रिलेशनशीपवरही भाष्य केलं. माझा पार्टनर उंच आणि दणकट असावा. बॉडी बिल्डर असावा. तो थोडा भावूक असला पाहिजे. माझ्या आयुष्यात मला उंच, मस्कुलर आणि इमोशनल पुरुष असावा, असं मला वाटतं, असं ती म्हणाली. अनायाने आपल्या मनातील पुरुषाची कल्पना मांडताच शोमध्ये आलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.

केवळ हसली

तुला क्रिकेटर्स आवडतात का? त्यांचे डीएम येतात का? असं प्रणितने तिला विचारलं. तेव्हा, मी क्रिकेट खेळायचे आणि असंख्य क्रिकेटपटूंसोबत खेळले आहे, असं तिने सांगितलं. तर, क्रिकेटरचे डीएम येतात का? प्रश्नावर तिने केवळ स्मित हास्य केलं आणि उत्तर देणं टाळलं.

यावेळी नातेसंबध, डेटिंग आणि पर्सनल अनुभवावरही तिने भाष्य केलं. अनायाने जे काही सांगितलं ते मनापासून आणि प्रामाणिकपणे सांगितलं. त्यामुळे तिचं म्हणणं तिच्या फॅन्सला भावलं. तिच्या मुक्त विचाराची लोक स्तुती करत आहेत. सोशल मीडियावर अनायाची क्लिप व्हायरल होत आहे. तिच्या रिलेशनशीपची चर्चा होत आहे. तिच्या फॉलोअर्सला तिच्याबाबत अजून बरच काही जाणून घ्यायचं आहे.

अनाया कोण आहे?

अनाया माजी क्रिकेटपटू संजय बांगरची मुलगी आहे. आर्यन बांगर म्हणून जन्मलेल्या अनायाने नंतर लिंग बदल करून मुलाची मुलगी झाली. सर्जरीनंतर मुलगी झाल्याचे तिने स्पष्ट केलं. पण ती आई बनू शकत नाही. मात्र, सरोगसीच्या माध्यमातून आई बनता येईल, असं तिने म्हटलं आहे.

Follow Us