Cricket : टी 20i मालिकेनंतर आता बांगलादेश दौरा, एकूण 6 सामने, सुरुवात केव्हापासून?

New Zealand tour of Bangladesh 2026 : न्यूझीलंड क्रिकेट टीम बांगलादेश दौऱ्यात वनडे आणि टी 20i मालिका खेळणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

Cricket : टी 20i मालिकेनंतर आता बांगलादेश दौरा, एकूण 6 सामने, सुरुवात केव्हापासून?
White Season Ball
| Updated on: Mar 29, 2026 | 2:19 AM

न्यूझीलंडची टी 20i वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर हारकीरी सुरुच आहे. टीम इंडियाने 8 मार्चला न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करुन आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर नाव कोरलं. इंडिया यासह एकूण 3 वर्ल्ड कप जिंकणारी पहिली टीम ठरली. वर्ल्ड कप विजयानंतर काही दिवस टीम इंडियाच्या खेळाडूंनी विश्रांती घेतली. मात्र उपविजेत्या न्यूझीलंडने मायदेशात 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात केले. न्यूझीलंडला मायदेशातही टी 20i मालिकेत काही खास करता आलं नाही.

न्यूझीलंडला मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर न्यूझीलंडने सलग 2 सामने जिंकले होते. त्यामुळे न्यूझीलंडला चौथ्या सामन्यात विजयी हॅट्रिक पूर्ण करुन मालिका आपल्या नावावर करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने निर्णायक क्षणी कमबॅक केलं. दक्षिण आफ्रिकेने सलग 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. दक्षिण आफ्रिकेने यजमान न्यूझीलंडला 3-2 ने लोळवलं. त्यानंतर आता न्यूझीलंड एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे.

न्यूझीलंडचा बांगलादेश दौरा

न्यूझीलंड क्रिकेट टीम आयपीएल 2026 दरम्यान बांगलादेश दौऱ्यावर असणार आहे. उभयसंघात एकूण 2 मालिकांमध्ये 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय आणि टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामुळे न्यूझीलंड बांगलादेश विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

एकदिवसीय आणि टी 20i मालिका

न्यूझीलंडच्या बांगलादेशच्या दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. भारतात आयपीएल 2026 चा थरार सुरु असताना बांगलादेशमध्ये 17 ते 23 एप्रिल दरम्यान वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. तर त्यानंतर 27 एप्रिल ते 2 मे दरम्यान 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे.

टॉम लॅथमला संधी मिळणार?

दरम्यान बांगलादेश दौऱ्यासाठी टॉम लॅथम याला संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टॉमला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या (चौथ्या आणि पाचव्या) सामन्याला मुकावं लागलं. टॉमला यातून पूर्णपणे बरं होण्यासाठी 3 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे टॉमला बांगलादेश दौऱ्यात संधी मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us