Odi Cricket : 2 सामने आणि 15 खेळाडू, वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, पहिली मॅच केव्हा? जाणून घ्या

Bangladesh vs Australia Odi Series 2026 : बांगलादेश क्रिकेट टीम मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 ते 14 जून दरम्यान वनडे सीरिज खेळणार आहे. मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी बांगलादेशकडून टीम जाहीर करण्यात आली आहे.

Odi Cricket : 2 सामने आणि 15 खेळाडू, वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, पहिली मॅच केव्हा? जाणून घ्या
Australia Cricket Team
Image Credit source: Bcci
| Updated on: Jun 03, 2026 | 9:16 PM

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेला बरेच महिने बाकी आहेत. मात्र क्रिकेट संघ या वर्ल्ड कप स्पर्धेच्या हिशोबाने तयारीला लागले आहेत. खेळाडूंचा वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सराव व्हावा आणि संघाची मोट बांधण्यात मदत व्हावी या हेतूने जास्तीत जास्त एकदिवसीय मालिकेचं आयोजन केलं जात आहे. तसेच वनडे सीरिजच्या आयोजनावर भर दिला जात आहे. बांगलादेश मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. या मालिकेत 9 जूनपासून एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या तिन्ही सामन्यांचं आयोजन हे एकाच मैदानात करण्यात आलं आहे.

बांगलादेश टीममध्ये 4 वर्षांनी ऑलराउंडरचं कमबॅक, कोण आहे तो?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पहिल्या 2 सामन्यांसाठी बुधवारी 3 जून रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मेहदी हसन मिराझ ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. बांगलादेश संघात आणखी कुणाला संधी मिळालीय? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. स्पिन ऑलराउंडर मोसाद्देक हुसैन याचं तब्बल 4 वर्षांनंतर बांगलादेश टीममध्ये कमबॅक झालं आहे.

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 9 जून, शेरे बांगला स्टेडियम, ढाका.

दुसरा सामना, 11 जून, शेरे बांगला स्टेडियम, ढाका.

तिसरा सामना, 14 जून, शेरे बांगला स्टेडियम, ढाका.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांसाठी बांगलादेश टीम : मेहदी हसन मिराझ (कर्णधार), सौम्या सरकार, सैफ हसन, तंझीद हसन, नजमुल हुसेन शांतो, तॉहीद हृदॉय, लिटन कुमार दास, मुसद्देक हुसेन सैकोट, काझी नुरुल हसन सोहन, रिशाद हुसेन, तन्वीर इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, नाहीद राणा.

बांगलादेश वनडे सीरिजसाठी सज्ज

ऑस्ट्रेलियाचा वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेशवर दबदबा, पाहा आकडेवारी

दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम बांगलादेश विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. उभयसंघात आतापर्यंत एकूण 22 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 22 पैकी 20 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला केवळ 1 सामना जिंकता आला आहे. तर उभयसंघातील एकमेव सामना रद्द करावा लागला होता. त्यामुळे यंदा मायदेशात मालिका होत असल्याने बांगलादेशकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धची आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.

Follow Us