क्रिकेट जगतात खळबळ! १८ वर्षीय प्रसिद्ध खेळाडूचे अचानक निधन, पाण्यासारखा पैसा ओतला तरी नको तेच घडलं

काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू शापूर जादरान याचं दुर्मिळ आजाराने निधन झालं होतं. या घटनेने क्रिडाविश्वात खळबळ उडाली असताना आता आणखी एक निधनाची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

क्रिकेट जगतात खळबळ! १८ वर्षीय प्रसिद्ध खेळाडूचे अचानक निधन, पाण्यासारखा पैसा ओतला तरी नको तेच घडलं
Mehdi Hasan Hridoy
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 25, 2026 | 1:51 PM

बांगलादेशच्या उदयोन्मुख तरुण क्रिकेटपटू मेहदी हसन हृदोय यांचे वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी निधन झाले. हृदोय हे लेफ्टी बॉलर होते आणि ते चटगांव डिव्हिजनच्या अंडर-१८ संघाकडून खेळले होते. हृदोय ल्युकेमियाच्या आजाराने ग्रस्त होते आणि त्यांचे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान २४ ऑक्टोबर रोजी राजधानी ढाकामध्ये त्यांचे निधन झाले. हृदोय यांच्या निधनामुळे क्रिकेट जगतात शोक पसरला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंवर हृदोय यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

बांगलादेशी माध्यमांच्या अहवालानुसार मेहदी हसन हृदोय यांचे शनिवारी निधन झाले. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना उपचारासाठी अँम्ब्युलन्समधून ढाकाला नेले जात होते. बांगलादेश क्रिकेट बोर्ड हृदोय यांच्या उपचाराच्या खर्चासाठी आर्थिक मदतही करत होते. २ जुलै रोजी युवा व क्रीडा राज्यमंत्री अमीनुल हक यांनी बीसीबी कार्यालयात हृदोय यांच्या वडिलांना अबुल कासिम यांना ५,००,००० टकांचा धनादेश सुपूर्द केला.

Loading...

युवा व क्रीडा मंत्रालयानेही हृदोय यांच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी मदत म्हणून ५ जुलै रोजी त्यांच्या कुटुंबाला वेगळ्या ५,००,००० टकांची रक्कम दिली होती. हृदोय यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंब, नातेवाईक आणि बांगलादेशच्या क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही शोक व्यक्त केला

हृदोय यांच्या निधनाबद्दल बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही दुःख व्यक्त केले. बीसीबीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “हृदोय यांनी चटोग्राम डिव्हिजनच्या अंडर-१८ संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यांना उज्ज्वल भविष्य असलेले होतकरू लेफ्टी जलद गोलंदाज म्हणून पाहिले जात होते. बीसीबी या कठीण काळात हृदोय यांच्या कुटुंब आणि प्रियजनांप्रती आपली खोल संवेदना व्यक्त करते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखाच्या वेळी शक्ती देवो.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us