Bcci : निवड समितीचा मोठा निर्णय, टीममध्ये अचानक बदल, ऑलराउंडरचा समावेश, कोण आहे तो?

Bcci India A Team : आगामी अफगाणिस्तान विरूद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी विदर्भकर हर्ष दुबे याला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. हर्ष दुबे याची भारतीय संघात निवड झाल्याने अनुकूल रॉय याचा फायदा झाला आहे.

Bcci : निवड समितीचा मोठा निर्णय, टीममध्ये अचानक बदल, ऑलराउंडरचा समावेश, कोण आहे तो?
Anukul Roy India A
Image Credit source: PTI
| Updated on: May 21, 2026 | 3:54 PM

भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय निवड समितीने श्रीलंका दौऱ्यातील ट्राय सीरिजसाठी इंडिया ए टीममध्ये अचानक बदल केला आहे. इंडिया ए टीम या ट्राय सीरिजसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. इंडिया ए व्यतिरिक्त श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए या संघात त्रिकोणी मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 21 जून रोजी ट्राय सीरिजची सांगता होणार आहे. बीसीसीआयने या ट्राय सीरिजसाठी काही दिवसांआधी इंडिया ए टीमची घोषणा केली होती. बीसीसीआय निवड समितीने इंडिया ए टीममध्ये विदर्भाच्या हर्ष दुबे याचा समावेश केला होता. मात्र आता हर्ष दुबे याच्या जागी इंडिया ए टीममध्ये ऑलराउंडर अनुकूल रॉय याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आलीय.

हर्ष दुबे याला का वगळलं?

आता अनुकूलला हर्षच्या जागी संधी का देण्यात आली? हर्ष दुबे याला का वगळलं? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. बीसीसीआयने या प्रश्नांची उत्तर प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहेत.

सध्या भारतात आयपीएल 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. आयपीएल 2026 स्पर्धेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 1 कसोटी आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. निवड समितीने हर्ष दुबे याला अफगाणिस्तान विरूद्धच्या या दोन्ही मालिकेत संधी दिली आहे. त्यामुळे हर्षच्या जागी इंडिया ए टीममध्ये अनुकूलला संधी दिली आहे, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.

अनुकूल रॉयची कामगिरी

दरम्यान अनुकूल सध्या आयपीएल स्पर्धेत केकेआरचं प्रतिनिधित्व करत आहे. अनुकूलने या हंगामातील 13 सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 43 धावा केल्या आहेत. तसेच अनुकूलने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 48 डावांत 1 हजार 279 धावा केल्यात. सोबतच अनूकुलने 59 विकेट्स मिळवल्या आहेत.

हर्ष दुबेचं नशिब फळफळलं

ट्राय सीरिजसाठी इंडिया ए सुधारित टीम : तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, सुर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान आणि अनुकुल रॉय.

Follow Us