Video : पांड्या आणि आकाश अंबानी बोलत असताना फॅन्सनी डिवचलं, हार्दिकने नंतर काय केलं पाहा

| Updated on: Mar 29, 2024 | 3:34 PM

आयपीएल 2024 मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्या या ना त्या कारणाने चर्चेत आहे. या पर्वाची सुरुवातच बऱ्याच वादानी झालेली दिसत आहे. हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवल्यापासून सुरु झालेला वाद काही संपताना दिसत नाही. त्यामुळे रोहित शर्माचे फॅन्स त्याला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : पांड्या आणि आकाश अंबानी बोलत असताना फॅन्सनी डिवचलं, हार्दिकने नंतर काय केलं पाहा
Video : पांड्या आणि आकाश अंबानीसमोरच रोहित शर्माच्या चाहत्यांचा 'गोंधळ', हार्दिकने शेवटी जाताना केलं असं...
Follow us on

आयपीएल स्पर्धेत भविष्याचा वेध घेत मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेतलं. ट्रेड विंडोच्या माध्यमातून 15 कोटी रुपये मोजले, तसेच कर्णधारपदही सोपवलं. यामुळे मुंबई इंडियन्स आणि खासकरून रोहित शर्माच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर हा फ्रेंचायसीचा निर्णय असताना मुंबई इंडियन्सचे फॅन्स हार्दिक पांड्याला ट्रोल करताना दिसत आहेत. त्यात मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे दोन सामने गमवल्याने आगीत तेल ओतल्यासारखं झालं आहे. दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्याला डिवचण्याची एकही संधी चाहत्यांनी सोडली नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हार्दिक पांड्या आणि आकाश अंबानी मैदानात बोलत उभे होते. रोहित शर्माच्या चाहत्यांनी यावेळी रोहित शर्माच्या नावाचा जयघोष सुरु केला. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याने केलेली कृती आता चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिक पांड्याने केलेली कृती कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत हार्दिक पांड्या आणि आकाश अंबानी बोलताना दिसत आहेत. त्या दरम्यान चाहत्यांनी त्याच्यासमोरच रोहित शर्माच्या नावाचा जयघोष सुरु केला. त्यानंतर हार्दिक पांड्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने वेगाने धावत जाताना दिसत आहे. यावेळी त्याने जोराने स्टेडियमवर लागलेल्या फेंसिंगवर हात मारला. त्याची ही कृती कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. मात्र हा व्हिडीओ कोणी शूट केला आणि त्याच्या सत्यतेबाबत सांगणं कठीण आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर माजी क्रिकेटपटूनीही टीकास्त्र सोडलं आहे. त्याने घेतलेल्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं आहे. जसप्रीत बुमरालला सुरुवातीला षटक न देणं, स्वत: फलंदाजीसाठी सर्वात खाली येण आणि गरजेवेळी आक्रमक फलंदाजी न करणं असे सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 6 धावांनी, तर सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला 31 धावांनी पराभूत केलं आहे. आता मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थान कस लागणार आहे. त्यात सूर्यकुमार यादव अनफिट असल्याने चिंता आणखी वाढली आहे.