दोन दिवसात ठरणार, हार्दिक पंड्या IPL 2022 मध्ये खेळणार की, नाही, परीक्षा द्यावीच लागेल

| Updated on: Mar 14, 2022 | 8:28 PM

ipl 2022: हार्दिक पंड्या IPL 2022 खेळणार की, नाही याचा निर्णय पुढच्या दोन दिवसात होईल.

1 / 5
हार्दिक पंड्या IPL 2022 खेळणार की, नाही याचा निर्णय पुढच्या दोन दिवसात होईल. पंड्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. पुढच्या दोन दिवसात त्याला फिटनेस चाचणी द्यावी लागेल. ही टेस्ट पास झाल्यानंतरच तो आयपीएलमध्ये खेळू शकतो. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. (PC-हार्दिक पंड्या फेसबुक)

2 / 5
चाचणी दरम्यान हार्दिक कशी गोलंदाजी करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. 28 मार्चला गुजरात टायटन्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. (PC-हार्दिक पंड्या फेसबुक)

3 / 5
हार्दिक पंड्या पुढचे दोन दिवस NCA मध्ये असेल व वेगवेगळ्या चाचण्यांमधून त्याला जावं लागेल. तो सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधला खेळाडू आहे. टी 20 वर्ल्डकप नंतर तो कुठल्याही क्रिकेट स्पर्धेत खेळलेला नाही. (PC-हार्दिक पंड्या फेसबुक)

4 / 5
"हार्दिकला फिटनेस टेस्ट पास करावीच लागेल. ही चाचणी अनिवार्य आहे. मागच्यावर्षी श्रेयस अय्यरने सुद्धा खांद्याच्या दुखापतीमधून सावरल्यानंतर आयपीएल खेळण्याआधी फिटनेस टेस्ट दिली होती" असं बीसीसीआयमधील सूत्राने सांगितलं (PC-हार्दिक पंड्या फेसबुक)

5 / 5
राष्ट्रीय टीम आणि एनसीए चिकित्सा स्टाफ नेहमी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील खेळाडूंवर नजर ठेवतो. बडोद्यातील पाच दिवसीय ट्रेनिंग शिबीरा दरम्यान हार्दिकने दोन-तीन सत्रामध्ये गोलंदाजी केली होती. (PC-हार्दिक पंड्या फेसबुक)