T20 World Cup 2021, Points Table: नामिबीयाचा स्कॉटलंडवर 4 विकेट्सनी विजय, भारतीय संघाला टाकलं मागे
पहिल्यांदाच सुपर 12 मध्ये स्थान मिळवलेल्या नामिबीया संघाने त्यांचा पहिला सामना जिंकत ग्रुप 2 मध्येही तिसरं स्थान मिळवलं आहे. त्यांनी भारताला मागं टाकलं आहे.

T20 Cricket World Cup 2021: यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) सामने अतिशय चुरशीचे सुरु असून काही धक्कादायक निर्णय़ही समोर येत आहे. टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात 5 वेळा भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानने भारताला नमवलं. तर सर्वाधिक वेळा टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव चाखावा लागला आहे. त्यानंतर आता प्रथमच सुपर 12 मध्ये पोहोचलेल्या नामिबाया संघाने स्कॉटलंडवर (Namibia vs Scotland) 4 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह गुणतालिकेत त्यांनी भारत, न्यूझीलंड या दिग्गजांनाही मागे टाकलं आहे.
अबुधाबीच्या शेख जायद मैदानात पार पडलेल्या या सामन्यात नामिबीयाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. उत्तम गोलंदाजी करत नामिबीयाने आपला निर्णय़ बरोबर ठरवत स्कॉटलंडला अवघ्या 109 धावांवर रोखलं. स्कॉटलंजच्या लीस्क (44) आणि ख्रिस ग्रेव्हस (25) या दोघांच्या भागिदारीमुळे स्कॉटलंडने 100 चा आकडा पार केला. त्यानंतर अवघ्या 110 धावां करण्यासाठी मैदानात आलेल्या नामिबीया संघाने सुमार फलंदाजी केली. पण बराच काळ क्रिजवर टिकून राहिलेल्या क्रेग विल्यम्सच्या 23 आणि जेजे स्मीतच्या नाबाद 32 धावांनी नामिबियाला 5 चेंडू आणि 4 गडी राखून विजय मिळवून दिला.
गुणतालिकेत भारताला टाकलं मागे
सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबीया हे संघ आहेत. यामध्ये पाकने भारत आणि न्यूझीलंड या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. तर अफगाणिस्तानने स्कॉटलंडला मात दिल्यामुळे ते 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. नामिबीया संघाने स्कॉटलंडला मात देत तिसरं स्थान गाठलं आहे. तर न्यूझीलंड, भारत हे संघ एक-एक पराभव स्वीकारुन चौथ्या, पाचव्या स्थानावर आहेत. तर स्कॉटलंडचा संघ दोन पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे.
सविस्तर गुणतालिका पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
हे ही वाचा
India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित
(In T20 World Cup 2021 Namibia beat scotland with 4 wickets in hand)