AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: एबी डिव्हिलियर्सप्रमाणे शॉट खेळायला गेला आणि बाद झाला, बांग्लादेशच्या खेळाडूची ही विकेट पाहाच!

इंग्लंड आणि बांग्लादेश या संघामध्ये झालेल्या विश्वचषकातील 20 व्या सामन्यात इंग्लंडने बांग्लादेश संघाला 8 विकेट्सनी मात देत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे.

VIDEO: एबी डिव्हिलियर्सप्रमाणे शॉट खेळायला गेला आणि बाद झाला, बांग्लादेशच्या खेळाडूची ही विकेट पाहाच!
इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यातील एक क्षण
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 9:06 PM
Share

T20 Cricket World Cup 2021: मागील काही वर्षात क्रिकेट या खेळात अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीला कसोटी क्रिकेट सर्वांचा आवडता प्रकार होता. पण आता टी20 क्रिकेटचं सर्व जग वेडं आहे. जसा प्रकार बदलला तसा खेळ खेळण्याची पद्धतही बदलली. आता फलंदाज विविध प्रकारचे क्रिकेटींग शॉट्स खेळत असतात. यात मागील दिशेने मारण्यात येणारे शॉट्स म्हणजे आधुनिक क्रिकेटची ओळख. त्यातही दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलीयर्स हा तर हे शॉट खेळण्यात तरबेज. दरम्यान इंग्लंड विरुद्ध बांंग्लादेश (England vs bangladesh) सामन्यातही एबीप्रमाणे बांग्लादेशचा मेहदी हसन यानेही स्कूप शॉट अर्थात मागच्या दिशेने चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला. पण तो यात अयशस्वी झाला.

तर सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेश संघाचे सर्वच फलंदाद अपयशी ठरत होते. बांग्लेदशकडून मुशफिकूर रहिम याने केवळ 29 इतक्याच सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याचवेळी 17 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मेहदी याने इंग्लंडच्या टाईमल मिल्स याला स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी चेंडू मागे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ख्रिस वोक्सच्या हातात गेल्याने मेहदी बाद झाला. त्यामुळे एबीसारखा शॉट खेळणं त्याला महाग पडलं आणि तो केवळ 11 धावा करुन बाद झाला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

इंग्लंडचा 8 गडी राखून विजय

अबुधाबीच्या शेख जायद मैदानात पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. पण हा निर्णय़ इंग्लंडच्या बोलर्सनी साफ चूकीचा ठरवत बांग्लादेशला अवघ्या 124 धावांवर रोखलं. बांग्लेदशकडून मुशफिकूर रहिम याने केवळ 29 इतक्याच सर्वाधिक धावा केल्या. पण इंग्लंडकडून मात्र अनुभवी टायमल मिल्सने उत्कृष्ट अशा 3 विकेट्स मिळवल्या. तर लिव्हिंगस्टन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर ख्रिस वोक्सनेही एक विकेट घेतली. त्यामुळे अवघ्या 124 धावांवर बांग्लादेशचा डाव आटोपला.

त्यानंतर अवघ्या 125 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाने सुरुवातच जबरदस्त केली. सलामीवीर जेसन रॉयने 38 चेंडूत 61 धावा करत विजयाच मोलाचं योगदान दिलं. त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर बटलरने 18, डेविड मलानने नाबाद 28 आणि जॉनी बेयरस्टोवने नाबाद 8 धावा करत संघाचा विजय पक्का केला.

ग्रुप 1 ची स्थिती काय?

सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. यामध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाने 1 पैकी 1 सामना जिंकत अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळवलं आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकने 2 पैकी 1 सामना जिंकत चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही सामने पराभूत होत बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

हे ही वाचा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित

T20 Ranking: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा विराटला रँकिगमध्येही फटका, पाकिस्तानच्या रिजवानने टाकलं मागे

T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!

(In England vs Bangladesh match bangladesh Mehidy hasan tries to play scoop shot and caught out)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...