Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यावर संकटाचे ढग, खराब हवामानाचा फटका बसणार?

| Updated on: Sep 25, 2022 | 6:54 PM

Ind vs Aus 3rd T20I Weather :  नागपुरात भारत-ऑस्ट्रेलियामधील सामना 8-8 षटकांचा खेळवला गेला होता. तर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा सामनाही त्याच धर्तीवर होण्याची शक्यताय. सविस्तर वाचा...

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यावर संकटाचे ढग, खराब हवामानाचा फटका बसणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यावर संकटाचे ढग
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ((Ind vs Aus 3rd T20I) तीन टी-20 (T-20) सीरिजचा तिसरा आणि अखेरचा सामना आज हैदराबादमध्ये रंगणार आहे. मात्र, या सामन्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. नागपुरात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात देखील पावसानं अडचण आणली होती. यावेळी संध्याकाळी सात वाजता होणारा सामना पावसाच्या अडथळ्यामुळे रात्री साडेनऊ वाजता सुरू झाला. तसाच प्रकार हैदराबादमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पहायला मिळू शकतो. हैदराबादमधील हवामान (Ind vs Aus 3rd T20I Weather) कसं आहे, याविषयी जाणून घ्या…

बीसीसीआयचं ट्विट

ढगाळ वातावरण

वेगवेगळ्या एजन्सींच्या अंदाजानुसार हैदराबादचे आकाश आज रात्री सामन्यादरम्यान ढगाळ राहील. मात्र, पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता खूपच कमी आहे. ही दिलासादायक बाब असली तरी कधीही वातावरण बदलू शकतो. हवामान माहिती वेबसाइट AccuWeatherच्या अंदाजानुसार संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण, संध्याकाळी 7 नंतर ही भीती कमी आहे.

तापमान किती?

तापमान 25 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर राहील. आर्द्रता देखील खूप जास्त असेल. अशा स्थितीत दुसऱ्या डावात संघाच्या गोलंदाजीवर होण्याची खात्री आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे चांगले होईल. अशा स्थितीत टीम इंडिया नाणेफेक जिंकून त्याचा योग्य फायदा घेईल, अशी अपेक्षा आहे.

8-8 षटकांचा खेळ

नागपुरात 23 सप्टेंबरला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांचा दुसरा टी-20 सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. कारण सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे मैदान वेळेवर पूर्णपणे कोरडे झाले नव्हते. अशा स्थितीत अडीच तासांनंतर सामना सुरू होऊन केवळ 8-8 षटकांचा खेळ झाला. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांनाही काहीसे समाधान मिळाले. आता प्रश्न असा आहे की, तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात असाच प्रकार होण्यची शक्यता आहे.