MS Dhoni Troll : पैशांसाठी भावनांशी खेळू नको, धोनीला नेटिझन्सचा सल्ला

MS Dhoni troll : एमएस धोनीच्या निवृत्तीच्या अफवा यापूर्वी अनेकदा उडल्या. यापूर्वी याविषयी अनेकदा चर्चाही झाल्या आहेत. यंदा चर्चा तर झाल्या. पण यावर एमएस धोनीच ट्रोल झालाय...

MS Dhoni Troll : पैशांसाठी भावनांशी खेळू नको, धोनीला नेटिझन्सचा सल्ला
एमएस धोनीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 6:19 PM

मुंबई : एमएस धोनीनं (MS Dhoni) रविवारी दुपारी म्हणजेच आज एक मोठी घोषणा करणार असल्याचं सोशल (Social Media) मीडियावर सांगितलं. त्यामुळे चाहत्यांच्या नजरा त्याच्यावर होत्या. धोनी नेमकी काय घोषणा करणार, कोणती महत्वाची आणि मोठी माहिती देणार, याविषयी चर्चा होऊ लागली. पण, घोषणेनंतर धोनी अचानक ट्रोल (MS Dhoni troll) झाला. अनेकांनी त्याच्यावर टीका केली. तर काहींनी म्हटलंय की, आमच्या भावनांशी खेळण्यात तू चूक केलीस. अनेक युजर्सनं एमएस धोनीला, हे योग्य नसल्याचं  म्हटलंय. पण, असं नेमकं काय झालं. एमएस धोनीनं अशी कोणती घोषणा केली की ज्यावर चाहते भडकले, याविषयी सविस्तर जाणून घ्या…

बिस्किट विश्वचषकाशी जोडलं

धोनीनं आज बातमी निवृत्तीसंदर्भात नव्हे तर एका बिस्किटच्या लाँचची दिली. त्यानं 2011च्या विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयाशी जोडून बिस्किट लाँच केलं होतं. धोनीनं देशात पुन्हा हे बिस्किट लाँच केलं. धोनीनं याचा संबंध विश्वचषकाशी जोडला.

धोनी काय म्हणाला?

धोनी म्हणाला की, 2011 मध्ये भारतानं विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी हे बिस्किट भारतात लाँच करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे बिस्किट देशात लाँच होत असून यावर्षी आणखी एक कप आहे. असं कनेक्शन असल्याचं त्यानं स्पष्ट केलं.

चाहते भडकले

धोनीच्या घोषणेनंतर काही चाहते संतापले. काही युजर्स म्हणतात की धोनीनं आमच्या अपेक्षा मारल्या. काहीतरी खास घडेल, असं आम्हाला वाटलं होतं.

हे ट्विट पाहा

एका यूजरनं म्हटलंय की तुम्ही करोडो लोकांचे आयकॉन आहात. काही पैशांसाठी त्यांच्या भावनांशी खेळू नका.

हे ट्विट पाहा

आधी आशा लावली, नंतर ट्रोल झाला

आजची घोषणा आयपीएलसंदर्भात असेल, असं नेटिझन्स आणि फॅन्सला वाटलं होतं. कदाचित धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर करेल, असंही बोललं गेलं. मात्र, आज त्यानं निवृत्तीची बातमी नसल्याचं स्पष्ट केलं आणि ट्रोल झाला.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.