ENG vs IND : जसप्रीत बुमराहकडे इंग्लंड दौऱ्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी, अश्विनला पछाडणार?

Jasprit Bumrah vs R Ashwin : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. बुमराहला यासाठी फक्त 10 विकेट्सची गरज आहे. जाणून घ्या.

ENG vs IND : जसप्रीत बुमराहकडे इंग्लंड दौऱ्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी, अश्विनला पछाडणार?
Jasprit Bumrah Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2025 | 10:06 AM

भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिलीच मालिका असणार आहे. ऑलराउंडर बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटने युवा आणि सलामीवीर शुबमन गिल याला कर्णधार केलं आहे. या मालिकेत टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. बुमराहकडे माजी सहकारी आणि फिरकीपटू आर अश्विन याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

बुमराह अश्विनला पछाडणार?

बुमराहकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात आर अश्विन याच्या सर्वाधिक वेळा 5 विकेट्सचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. अश्विनने त्याच्या कसोटी कारकीर्दीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या 3 साखळ्यांमध्ये एकूण 11 वेळा 5 विकेट्स घेण्याची किमया केली आहे. अश्विनने या साखळीतील एकूण 41 सामन्यांमधील 78 डावांमध्ये 195 विकेट्स घेतल्या आहेत. तर या स्पर्धेत सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलिया फिरकीपटू नॅथन लायन हे दोघे संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. या दोघांनी प्रत्येकी 10 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे बुमराहकडे इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत 2 वेळा 5 विकेट्स घेऊन आर अश्विन याचा महारेकॉर्ड ब्रेक करण्यासह नॅथन लायनला मागे टाकण्याची संधी आहे.

मिचेल स्टार्कला पछाडण्याची संधी

जसप्रीत बुमराहकडे आर अश्विन याच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला मागे टाकण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. तर मिचेल स्टार्क चौथ्या स्थानी आहे. स्टार्कला मागे टाकण्यासाठी बुमराहला फक्त 16 विकेट्सची गरज आहे. स्टार्कने या साखळीतील 45 सामन्यांमध्ये 156 विकेट्स घेतल्या आहेत. तर 35 सामन्यांमध्ये 156 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

फक्त 3 सामनेच खेळणार

जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच खेळणार आहे. बुमराहने बीसीसीआयला याबाबत इंग्लंड दौऱ्याआधीच सांगितलं आहे. मात्र बुमराह कोणत्या 3 सामन्यांमध्ये खेळणार? हे अजूनही स्पष्ट नाही. हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल या दोघांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. गंभीरला या पत्रकार परिषदेत बुमराह कोणत्या 3 सामन्यांमध्ये खेळणार? असा प्रश्न करण्यात आला. “तो कोणत्या 3 सामन्यांमध्ये खेळणार हे स्थिती आणि गरजेनुसार निश्चित केलं जाईल”, असं उत्तर गंभीरने दिलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us