INDvsSL Ishan kishan: ‘पैसा वसूल भाईसाहब’ इशानच्या धमाकेदार फलंदाजीनंतर नेटीझन्सच्या भन्नाट Reaction

INDvsSL Ishan kishan: वेस्ट इंडिज विरुद्ध सातत्याने अपयशी ठरल्यानंतर इशान किशनने (Ishan kishan) आज श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार फलंदाजी केली.

| Updated on: Feb 24, 2022 | 9:09 PM
1 / 5
वेस्ट इंडिज विरुद्ध सातत्याने अपयशी ठरल्यानंतर इशान किशनने आज श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार फलंदाजी केली. डावखुऱ्या इशान किशनने आज 56 चेंडूत 89 धावांची खेळी केली. यात 10 चौकार आणि तीन षटकार होते. (Photo: BCCI)

वेस्ट इंडिज विरुद्ध सातत्याने अपयशी ठरल्यानंतर इशान किशनने आज श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार फलंदाजी केली. डावखुऱ्या इशान किशनने आज 56 चेंडूत 89 धावांची खेळी केली. यात 10 चौकार आणि तीन षटकार होते. (Photo: BCCI)

2 / 5

पहिल्या दोन षटकात रोहित-इशानने सावध फलंदाजी केली. पण तिसऱ्या षटकापासून इशान आक्रमक झाला. त्याने चामिका करुणारत्नेच्या एकाच षटकात तीन चौकार लगावले. (Photo: BCCI)

3 / 5

पावप्लेमध्ये तडाखेबंद फलंदाजी करणाऱ्या इशानने त्यानंतरही आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. त्याने 30 चेंडूत 6 चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याने आज दुसरं अर्धशतक झळकावलं. एकवर्षानंतर इशानने टी 20 मध्ये अर्धशतक झळकावलं. यापूर्वी मागच्यावर्षी मार्च महिन्यात डेब्यूमध्ये त्याने पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. (Photo: BCCI)

4 / 5

इशान किशनला यंदाच्या IPL 2022 च्या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. इशान यंदाच्या सीजनमध्ये ऑक्शनमधला सर्वात महागडा खेळाडू आहे. आज त्याने त्या लौकीकाला साजेसा खेळ केला. आज इशानची बॅटिंग पाहून मुंबई इंडियन्सची Reaction अशी असेल.

5 / 5

इशान किशन धावा करतो, तेव्हा जग असं असतं, असं एका नेटीझनने हा फोटो टि्वट करुन म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us