‘आता शरीर साथ देत नाही’, 31 वर्षाच्या भारतीय महिला क्रिकेटपटूने स्वीकारली निवृत्ती

| Updated on: Feb 22, 2022 | 7:30 AM

भारतीय महिला क्रिकेट संघातील (Indian Women Cricket Team) फलंदाज वीआर वनिताने (VR Vanitha) वयाच्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे.

आता शरीर साथ देत नाही, 31 वर्षाच्या भारतीय महिला क्रिकेटपटूने स्वीकारली निवृत्ती
vanitha instagram
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघातील (Indian Women Cricket Team) फलंदाज वीआर वनिताने (VR Vanitha) वयाच्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे. वनिताने टि्वट करुन निवृत्तीची घोषणा केली. वनिताने तिच्या टि्वटमध्ये झूलन गोस्वामी आणि मिताली राज या भारतीय महिला संघातील दोन दिग्ग्ज खेळाडूंचे आभार मानले आहेत. वनिताने भारतासाठी 2014 ते 2016 दरम्यान सहा वनडे आणि 16 टी-20 सामने खेळले आहेत. वनिताने जानेवारी 2014 मध्ये श्रीलंकेविरोधात वनडे मध्ये डेब्यू करुन आंतरराष्ट्रीय करीयरची सुरुवात केली होती. मिताली आणि झूलनशिवाय तिने आपलं कुटुंब, मित्र परिवार, मार्गदर्शक आणि टीमच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याशिवाय तिने कर्नाटक आणि बंगाल क्रिकेट संघटनेचेही आभार मानलेत.

शरीर साथ देत नाही

शरीर साथ देत नसल्यामुळे निवृत्ती स्वीकारत असल्याचे वनिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “19 वर्षांपूर्वी मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी एक छोटीशी मुलगी होते. मला क्रिकेट खेळायला आवडायचं. आजही क्रिकेटबद्दल माझं प्रेम कायम आहे. माझं मन सांगतं की, क्रिकेट खेळणं सुरु ठेव. पण माझं शरीर मला सांगतय, आता थांबलं पाहिजे. त्यामुळे मी निवृत्तीचा निर्णय घेतलाय. निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे”
“मला भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची जी संधी मिळाली, त्याबद्दल मी आभारी आहे. हा शेवट नाहीय, तर नव्या आव्हानांची सुरुवात आहे” असं वनिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

असं होतं करीयर

वनिताने सहा वनडे सामने खेळताना 85 धावा केल्या. त्याशिवाय 16 टी-20 सामन्यात 216 धावा केल्या. 2021-22 च्या देशांतर्गत सीजनमध्ये वनिताने बंगालच्या महिला सिनियर संघाला वनडे ट्रॉफीच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचवले होते. तिने त्या स्पर्धेत 225 धावा केल्या होत्या. आंध्र प्रदेश विरुद्ध 61 धावा केल्या होत्या. त्यानंतर 71 चेंडूत 107 धावा केल्या होत्या.

india womens team batter vr vanitha announces retirement from cricket at the age of 31 thanked mithali raj and jhulan goswami