Eng Vs Ind : चेन्नईचं मैदान गाजवणारे भारताच्या विजयाचे पाच चेहरे!

| Updated on: Feb 16, 2021 | 1:32 PM

चेन्नई : चेन्नईच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा बदला टीम इंडियाने घेतला आहे. भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंड (India Vs England) संघाला तब्ब्ल 317 धावांनी धूळ चारली आहे. याचसोबत भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअमवर येत्या 24 तारखेला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा सामना पार पडणार आहे. (Indian Team Beat England in second […]

Eng Vs Ind : चेन्नईचं मैदान गाजवणारे भारताच्या विजयाचे पाच चेहरे!
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
Follow us on

चेन्नई : चेन्नईच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा बदला टीम इंडियाने घेतला आहे. भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंड (India Vs England) संघाला तब्ब्ल 317 धावांनी धूळ चारली आहे. याचसोबत भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअमवर येत्या 24 तारखेला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा सामना पार पडणार आहे. (Indian Team Beat England in second Chennai test Five hero)

भारतीय संघाच्या विजयात अष्टपैलू आर. अश्विनने (R Ashwin) सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्माचं शतक (Rohit Sharma), विराट कोहली (Virat kohli) आणि ऋषभ पंतचं (Rishabh Pant) अर्धशतक, अक्षर पटेल (Axar Patel) याचं ऐतिहासिक कसोटी पदार्पण… आणि या सगळ्यांवर मात म्हणजे अष्टपैलू खेळाडू आर. अश्विनचं दमदार शतक आणि पाच विकेट्स… पाहुयात या विजयाला कारणीभूत भारतीय 5 चेहरे…

रवीचंद्रन अश्विन :

बॅटिंग आणि बोलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये अश्विनने बाजी मारली. आपल्या घरच्या मैदानावर आर अश्विनने दुसऱ्या कसोटीत ऑलराऊंड प्रदर्शन केलं. पहिल्या डावांत आर अश्विनने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. त्याच्यामुळेच इंग्लंडचा पहिला जाव 134 रन्समध्ये ऑलआऊट झाली. यानंतर टीम इंडिया संकटात असताना अश्विन बॅटींग करण्यासाठी मैदानात आला आणि आश्चर्य म्हणजे त्याने 136 चेंडूंमध्ये दणदणीत शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमधलं अश्विनने पाचवं शतक ठोकलं. एवढंच करुन अश्विन थांबला नाही. तर दुसऱ्या डावातही त्याने इंग्लंडच्या तीन बॅट्समनला तंबूत पाठवलं.

रोहित शर्मा :

चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर रोहित शर्माच्या बॅटिंगचा नजारा पाहायला मिळाला. पहिल्या डावांत अप्रतिम फलंदाजी केली. त्याने 161 धावा फटकावल्या. 231 बॉलचा सामना करताना त्याने 18 चौकार आणि 2 षटकार ठोकले. दुसऱ्या डावातही त्याने चांगली सुरुवात केली होती. मात्र 26 धावांवर तो बाद झाला. फलंदाजांसाठी विकेट तितकीशी चांगली नसताना देखील रोहितने या कसोटीत 187 धावा केल्या.

ऋषभ पंत :

विकेटकीपर ऋषभ पंतचा फॉर्म तर कमाल चालला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दाखवलेला जलवा ऋषभने या मॅचमध्ये देखील कायम ठेवला आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावांत त्याने 58 रन्स केले. तर दुसऱ्या डावात 8 रन्सवर तो दुर्दैवीरित्या आऊट झाला. परंतु पहिल्या डावांतले 58 रन्स त्याने अतिशय कठीण परिस्थितीत केले होते. याशिवाय ऋषभने या सामन्याक दोन कॅच आणि एक स्टम्पिंगही केली.

विराट कोहली :

भारतीय कर्णधार विराट कोहली पहिल्या डावांत शून्यावर बाद झाला. फलंदाजांना अनुकुल नसलेल्या खेळपट्टीवर विराटने 62 रन्सची महत्त्वाची इनिंग खेळली. माजी क्रिकेटपटूंनी विराटच्या खेळीचं शतकापेक्षाही महत्त्वाची खेळी असं वर्णन केलं. त्याचं कारणही तसंच होतं… फलंदाजांना अजिताबच साथ न देणारी विकेट… अशा विकेटवर विराटने महत्त्वपूर्ण 62 धावा काढल्या.

अक्षय पटेल :

अक्षर पटेल याचं कसोटी क्रिकेट पदार्पण अविस्मरणीय ठरलं. या कसोटीच्या दुसऱ्या डावात पाच बळी घेऊन अक्षर पटेलने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. पदार्पणातील कसोटीत एकाच डावात पाच बळी टिपणारा तो नववा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अक्षरने पहिल्या डावातही दोन बळी टिपले होते. मात्र, दुसऱ्या डावात त्याच्या गोलंदाजीची धार आणखीनच वाढली. त्याने अवघ्या 21 षटकांत इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले. यामध्ये पाच निर्धाव षटकांचा समावेश आहे.

(Indian Team Beat England in second Chennai test Five hero)

हे ही वाचा :

Axar Patel | पदार्पणात अक्षर पटेलचा इंग्लंडला जोरदार ‘पंच’; ‘ही’ कामगिरी करणारा नववा भारतीय

India vs England 2nd Test 4th Day | फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण, दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरीत

IND vs ENG | अश्विन ठरला ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय फलंदाज, धोनीचा रेकॉर्ड मोडीत