Axar Patel | पदार्पणात अक्षर पटेलचा इंग्लंडला जोरदार ‘पंच’; ‘ही’ कामगिरी करणारा नववा भारतीय

या कसोटीच्या दुसऱ्या डावात पाच बळी घेऊन अक्षर पटेलने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. | Axar Patel

Axar Patel | पदार्पणात अक्षर पटेलचा इंग्लंडला जोरदार 'पंच'; 'ही' कामगिरी करणारा नववा भारतीय
अक्षरने पहिल्या डावातही दोन बळी टिपले होते. मात्र, दुसऱ्या डावात त्याच्या गोलंदाजीची धार आणखीनच वाढली.
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 1:13 PM

चेन्नई: भारतीय संघाने चेपॉकच्या मैदानावरील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या संघाला (Ind vs Eng) 317 धावांनी नमवून पहिल्या कसोटीतील हिशेब चुकता केला आहे. दुसऱ्या कसोटीतील भारताच्या विजयात फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कसोटीच्या पहिल्या डावात आर. अश्विनने इंग्लंडचा संघ जमीनदोस्त केला होता. तर दुसऱ्या डावात अक्षर पटेलने (Axar patel) इंग्लंडच्या निम्म्या संघाला तंबूत परत धाडले. (Axar patel bowling on india vs england 2021 2nd test day 4)

या कसोटीच्या दुसऱ्या डावात पाच बळी घेऊन अक्षर पटेलने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. पदार्पणातील कसोटीत एकाच डावात पाच बळी टिपणारा तो नववा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अक्षरने पहिल्या डावातही दोन बळी टिपले होते. मात्र, दुसऱ्या डावात त्याच्या गोलंदाजीची धार आणखीनच वाढली. त्याने अवघ्या 21 षटकांत इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले. यामध्ये पाच निर्धाव षटकांचा समावेश आहे.

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरीत

टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी (india vs england 2021 2nd test day 4) सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.

टॉस फॅक्टर महत्वाचा

या दुसऱ्या सामन्यात टॉस फॅक्टर महत्वाचा ठरला. टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय टीम इंडियाने योग्य ठरवत चांगली कामगिरी केली. यामुळे एकूणच भारतीय संघ टॉसचा बॉस ठरल्याने विजयामध्ये टॉसने महत्वाची भूमिका बजावली. याच मैदानात इंग्लंडने पहिल्या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सामनाही जिंकला होता. यामुळे चेन्नईच्या या एम ए चिदंबरम स्टेडियमवर टॉस फॅक्टर म्हत्वाचा आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 2nd Test 4th Day | फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण, दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरीत

IND vs ENG | अश्विन ठरला ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय फलंदाज, धोनीचा रेकॉर्ड मोडीत

(Axar patel bowling on india vs england 2021 2nd test day 4)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.