AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी खुशखबर! गॅस सिलिंडरचा भाव वाढला पण….युद्ध सुरू असले तरी 300 रुपये…सामान्यांना मोठा दिलासा!

इराण इस्रायल युद्धाची भारताला झळ बसायला सुरुवात झाली आहे. गॅस सिलिंडरचा भाव 60 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. परंतु सध्या सिलिंडरचा भाव वाढलेला असला तरीही नागरिकांना एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे.

मोठी खुशखबर! गॅस सिलिंडरचा भाव वाढला पण....युद्ध सुरू असले तरी 300 रुपये...सामान्यांना मोठा दिलासा!
GAS CYLINDER Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2026 | 10:56 PM
Share

Gas Cylinder Price : मध्य पूर्वेतील तणावाच्या स्थितीची झळ सध्या भारतालाही बसत आहे. भारताला कच्चे तेल तसेच सीएनजी, एलएनजी या नैसर्गिक वायूचा पुरवठा हा आखाती देशांतूनच होतो. इराणने होर्मुझची सामुद्रधुनीच बंद केल्यामुळे संपूर्ण जलवाहतूक ठप्प आहे.परिणामी भारतात इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली नसली तरीही युद्धाची स्थिती अशीच राहिली तर भविष्यात मात्र इंधनाचे दर वाढतील अशी शंका व्यक्त केली जात आहे. सध्यातरी भारतात घरगुती गॅस सिलिंडरचा तसेच व्यावसायिक सिलिंडरचा भाव वाढवण्यात आला आहे. परिणामी सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. असे असतानाच आता या भाववाढीनंतर सामान्यांना काहीसा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा भाव लगेच वाढणार नाही. सध्या गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे 14.2 किलोचे गॅस सिलिंडर 913 रुपयांना मिळत आहे. हेच गॅस सिलिंडर अगोदर 853 रुपयांना मिळायचे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परंतु याआधी झालेल्या नफ्यामुळे तेल कंपन्या सध्याच्या आणीबाणीच्या स्थितीला सहन करू शकत आहेत. त्यामुळे लगेच पेट्रोल आणि डिझेलचाही भाव वाढण्याची शक्यता नाही.

300 रुपयांची सबसीडीदेखील चालूच राहणार

तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सध्याच वाढ होणार नाही, असेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थींना मिळत असलेली 300 रुपयांची सबसीडीदेखील चालूच राहणार आहे. त्यामुळे सध्या गॅस सिलिंडरचा भाव वाढला असली तरीही या योजनेच्या 10.33 कोटी लाभार्थी कुटुंबांना 300 रुपयांच्या अनुदानाचा फायदा मिळत राहणार आहे.

दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध लवकरात लवकर थांबावे यासाठी चीन, रशिया यासारख्या देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. चीनने मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय