AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या महिलांचे गौतम अदानींकडून स्मरण

Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या आयुष्याची घडण आणि मूल्ये घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलांचे स्मरण केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या महिलांचे गौतम अदानींकडून स्मरण
Gautam AdaniImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 08, 2026 | 7:14 PM
Share

आपल्या आयुष्याची घडण आणि मूल्ये घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलांचे उद्योगपती गौतम अदानी यांनी आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्मरण केले आहे. अदानी यांनी या महिलांना आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असे संबोधले आहे. लिंक्डइनवर भावनिक पोस्ट शेअर करत अदानी यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील महिलांचा त्यांच्या आयुष्यावर अतिशय खोल प्रभाव पडला आहे. जीवन, जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीबाबत नवी दृष्टी देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

आईकडून मिळाली ताकद

प्रत्येक मुलासाठी आईच पहिली गुरू असते. त्याचप्रमाणे गौतम अदानी यांच्यासाठीही त्यांची आईच पहिली शिक्षिका होती. त्यांच्या आईचा प्रभाव त्यांच्या आयुष्यात कायम राहिला आहे. लहानपणी त्यांनी आईकडून भारतातील पुराणकथा ऐकत मोठे झाले. अदानी म्हणतात की, त्या कथा पाठ्यपुस्तकांपेक्षा खूप मोठी मूल्ये देणाऱ्या होत्या. धैर्य, त्याग, कर्तव्य आणि विश्वास यांची बीजे त्यांच्या मनात पेरणाऱ्या या कथा असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त 16 व्या वर्षी स्वतः काहीतरी साध्य करण्याच्या इच्छेने त्यांनी घर सोडून मुंबई गाठली. अशा अनिश्चित भविष्याच्या दिशेने मुलाला पाठवण्यासाठी त्यांच्या आईमध्ये किती धैर्य असावे, असा प्रश्नही अदानी यांनी उपस्थित केला.

पत्नीचे कौतुक

गौतम अदानी यांनी आपल्या पत्नी प्रीती अदानी यांच्याबाबत बोलताना माझ्या अंतःकरणाची राखण करणारी असे विधान केले आहे. दंतवैद्य असलेल्या प्रीती अदानी यांनी अदानी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेमार्फत शिक्षण, आरोग्य, शाश्वत उपजीविका आणि समुदाय विकास अशा क्षेत्रांत 22 राज्यांमध्ये काम करून कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे.

सुनांबाबतही भाष्य

गौतम अदानी यांनी आपल्या दोन सुना, परिधी आणि दिवा यांचाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गौरव केला. दोघींनीही कुटुंबात नवा दृष्टिकोन आणल्याचे त्यांनी सांगितले. परिधी या वकील आहेत, तर दिवा या डिझायनर असून विशेष गरज असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी काम करतात.

नातवंडांचा प्रभाव

आपल्या तीन नातींमुळे मिळणारा आनंदही अदानी यांनी सांगितला. छोट्या मुलींमुळे कामाचा ताणही कमी होतो, असे त्यांनी सांगितले. ‘एखादा पुरुष आपले आयुष्य बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्प आणि व्यवसाय उभारण्यात घालवतो. पण जेव्हा एक लहान नात त्याच्या मांडीवर येऊन पूर्ण विश्वासाने त्याच्याकडे पाहते, तेव्हा तो पुरुष हे सगळं का उभारत आहे याचं खरं उत्तर त्याला मिळतं,’ असे अदानी यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले.

शेवटी त्यांनी भावनिक शब्दांत लिहिले की, ‘जीवनाची सर्वात मजबूत पायाभरणी स्टील किंवा काँक्रीटने होत नाही. आपल्याला घडवणारे लोकच ही पायाभरणी करतात. माझ्या प्रवासाला जर जगाने कधी आठवले, तर ते यासाठीच असेल,’ असे म्हणत त्यांनी आपली पोस्ट संपवली.

Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...