AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या..; ‘बिग बॉस मराठी 6’तून बाहेर पडलेल्या रुचिता जामदारने मागितली माफी

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरातून रुचिता जामदार बाहेर पडली आहे. एलिमिनेशननंतर तिने सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहित त्यात जाहीर माफी मागितली आहे. रुचिताने या पोस्टमध्ये काय लिहिलंय, ते सविस्तर वाचा..

घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या..; 'बिग बॉस मराठी 6'तून बाहेर पडलेल्या रुचिता जामदारने मागितली माफी
Ruchita Jamdar Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 08, 2026 | 5:10 PM
Share

‘बिग बॉस मराठी 6’तील या आठवड्याच्या एलिमिनेशनने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. घरातील एकूण सात स्पर्धक नॉमिनेट झाले होते. ज्यामध्ये रुचिता जामदार, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे, सागर कारंडे, प्रभू शेळके, संस्कृती साळुंके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. या सात जणांपैकी रुचिता जामदारला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. हा निर्णय बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी जितका आश्चर्यकारक होता, तितकाच तो प्रेक्षकांसाठीही होता. कारण रुचिता किमान टॉप 5 स्पर्धकांपर्यंत नक्की पोहोचेल, असा अंदाज अनेकांकडून व्यक्त केला होता. परंतु त्याचसोबत घरातील तिच्या वागणुकीबाबत वारंवार सोशल मीडियावर टीकासुद्धा झाली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर रुचिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सर्वांची माफी मागितली आहे. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय.

रुचिता जामदारने मागितली माफी

‘बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले, तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार,’ अशा शब्दांत ती व्यक्त झाली आहे. रुचिताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रुचिताच्या एविक्शनबद्दल बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक धनंजय पोवार यानेसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं आहे. “मला असं वैयक्तिक वाटतंय की याच्या आधी रोशन भजनकरला खूप मतं मिळाली होती. तरीही रोशन बिग बॉसच्या घराबाहेर पडला. आता रुचिताला खूप मतं मिळाली होती, असं मला कळतंय. कारण रुचिता कंटेंट देतेय. मागचा पूर्ण आठवडा तिने बिग बॉसला कंटेंट दिला होता. मग तरीही रुचिता बाहेर गेली”, असं धनंजय म्हणाला.

रुचिता जामदार ही मूळची कोल्हापूरची असून पहिल्या एपिसोडपासून ती चर्चेत आहे. तिचे वडील स्विगी डिलिव्हरीचं काम करतात. तर रुचिता सुरुवातीला लोकांच्या लग्नामध्ये डान्स करून पैसे कमवायची. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने सुरुवात केली होती.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?