AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमध्ये अमेरिका स्पेशल फोर्स घुसवणार ? व्हिएतनामसारखी स्थिती तर होणार नाही ना ?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणमध्ये गरज लागली तर जमीनीवरील लढाई करण्यासाठी स्पेशल फौजा घुसवण्यात येऊ शकतात असे म्हटले आहे. मात्र, आतापर्यंत अमेरिकेचा जमीनीवरील युद्धाचा इतिहास चांगला नसून त्यात अमेरिकेचे नुकसानच झाले आहे.

इराणमध्ये अमेरिका स्पेशल फोर्स घुसवणार ? व्हिएतनामसारखी स्थिती तर होणार नाही ना ?
American delta force
| Updated on: Mar 08, 2026 | 10:41 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या दरम्यान आता जमिनीवरुन हल्ला करण्याची रणनिती सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलिकडच्या वक्तव्यावरुन यास आणखी हवा मिळाली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की जर स्थिती जर खूपच गंभीर झाली तर अमेरिकेचे सैन्य जमीनीवर उतरुन युद्ध सुरु करु शकते.या वक्तव्यामुळे आता अमेरिकेवर आता बुट्स ऑन द ग्राऊंड म्हणजे जमीनी युद्धाची वेळ आली आहे का असा सवाल केला जात आहे.

अमेरिका आणि इस्राईलने संयुक्तपणे इराणवर २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केला आहे. त्यानंतर आज युद्धाचा नववा दिवस आहे. युद्धात इराणची हानी जास्त झाल्याचे म्हटले जात आहे. त्यांचे पहिल्या फळीतील सर्व नेते ठार झाले आहेत.तरीही इराणने शेजारील ९ राष्ट्रांमधील अमेरिकेच्या तळांना टार्गेट करत आपण शेवटपर्यंत युद्ध लढणार आहोत असे अमेरिकेला दाखवून दिले आहे.आता निर्णायक लढाईसाठी अमेरिकेने जर परिस्थिती फारच नाजूक झाली तर अमेरिका आपल्या जमीनीवर फौजा इराणमध्ये घुसवू शकतात असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

सध्या अमेरिकेने इराणवर आकाश आणि समुद्रातून हल्ले सुरु केले आहेत. इराणच्या अनेक भागात सतत सायरनचे आवाज घुमत आहेत. अनेक इमारती नष्ट झाल्या आहेत. मृतांचा आकडा देखील दीड हजाराच्यापर्यंत गेला आहे. त्यामुळे आता स्पष्ट झाले आहे की अमेरिका आता इराणच्या आत आपली स्पेशल फोर्स उतरवण्याच्या विचारात आहे. इराणवर सातत्याने हवाई आणि समुद्री मार्गे हल्ले करुनही इराणने माघार न घेतल्याने व्हाईट हाऊस आता अन्य सैन्य कारवाईचा पर्यायांवर विचार करत आहे.

बातमीनुसार ट्रम्प आता इराणमध्ये आपल्या फौजा घुसवू शकतात. या अमेरिकन स्पेशल कमांडोंचा मुख्य उद्देश्य इराणच्या अणू प्रकल्पांना नष्ट करणे हा असणार आहे. दसरे म्हणजे जमीनी सैन्य दबावाने इराणला कमजोर करण्याचा प्रयत्न असणार आहे. तिसरी बाब म्हणजे वॉशिग्टनला व्हेनेझुएलाच्या धर्तीवर इराणच्या तेल संसाधनांवर नियंत्रण हवे आहे.

इराणने अमेरिकेला दिला इशारा –

अमेरिका स्पेशल फोर्सच्या मदतीने स्ट्रेट ऑफ होर्मुज सारख्या महत्वाच्या समुद्री मार्गावर नियंत्रण मिळवू इच्छीत आहे. या मार्गातून जगातील २० ते २५ टक्के तेलाच्या जहाजांची वाहतूक केली जाते. अमेरिकेच्या या दबावाचा अंदाज इराणला देखील आला आहे. इराणने स्पष्ट शब्दात अमेरिकेला इशारा दिला आहे की जमीनीवरुन जर हल्ला झाला तर इराणचे उत्तर अत्यंत कडक असेल आणि यासाठी इराणचे सैन्य संपूर्णपणे सज्ज आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, आम्ही वाट पाहातोय

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे की जर अमेरिकेने जमीनीवर हल्ला केला तर आमचे सैनिक त्यांची वाट पाहात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जमीनीवरुन सैनिकी कारवाईचा इन्कार करता येत नाही. मात्र, ते असेही म्हणाले मोठ्या प्रमाणावर तैनाती नसणार. एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की जमीनीवर सैनिकांचा वापर केवळ चांगल्या कारणांसाठी केला जाईल.

युद्धात दोन्ही पक्षाचे नुकसान

या युद्धात दोन्ही पक्षांची मोठी हानी झाली आहे. पेंटागनच्या आकडेवारीनुसार इराणच्या हल्ल्यात सहा अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. तर १८ सैनिक जखमी झाले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या या युद्धात इराणच्या किमान १,३३२ लोकांचा मृ्त्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये इस्राईलचे सैनिक आधीपासूनच तैनात आहेत. इस्राईलने द.लेबनॉनमधील लोकांना या भागातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. देशाच्या आत २७ किमीपर्यंत हे आदेश लागू झाले आहेत. या मोहिमेचा उद्देश्य लेबनॉनमध्ये लपलेल्या इराण समर्थित हेजबोल्लाह संघटनेला कमजोर करणे आहे आहे.

इराण व्हिएतनाम होणार का ?

अमेरिकेने जेथे जेथे आपले सैन्य जमीनीवर उतरवले तेथे तेथे अमेरिकेला दीर्घकालीन युद्धात अडकून पडावे लागले असून नुकसानही मोठे झाले आहे. व्हिएतनाम युद्धापासून ते अफगाणिस्तान आणि इराक ही ताजी उदाहरणे आहेत. त्यामुळे इराणमध्येही जर अमेरिकेने सैन्य उतरवले तर एक दीर्घकालीन आणि खतरनाक युद्ध होऊ शकते असे म्हटले जात आहे.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.