AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel and US War : आंतरराष्ट्रीय कायदा संपला, रशियाने केला आरोप, पुतीन म्हणाले तातडीने ‘P-5’ बैठक बोलवा

इराणवर अमेरिका आणि इस्राईलने संयुक्तपणे कारवाई सुरु केल्यानंतर गेले नऊ दिवस मध्य पूर्वेत घमासाम युद्ध सुरु आहे. या दरम्यान, आता रशियाने या संकटातून मार्ग करण्यासाठी “P5” समिट बोलवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

Iran-Israel and US War : आंतरराष्ट्रीय कायदा संपला, रशियाने केला आरोप, पुतीन म्हणाले तातडीने ‘P-5’ बैठक बोलवा
President Vladimir Putin
| Updated on: Mar 08, 2026 | 9:50 PM
Share

इराणवर अमेरिका आणि इस्राईलने हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध पेटले आहे. वेगाने पसरत चाललेल्या या युद्धामुळे आता रशियाने चिंता व्यक्त केली आहे. रशियाने म्हटले आहे की इराणवर अमेरिका – इस्राईल हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव वेगाने वाढत असून आंतरराष्ट्रीय कायदा वास्तविक समाप्त झाला आहे. सध्याच्या स्थितीला पाहून आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी “P5” म्हणजे युएन सिक्युरिटी काऊन्सिलच्या पाच कायम सदस्य देशांची ( रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड ) एक परिषद बोलवण्याची मागणी केली आहे.

आंतरराष्ट्रीय कायदा कागदावर

रशियाच्या क्रेमलिन येथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला पुन्हा आणण्याची मागणी केली आहे. यात ग्लोबल सिक्युरिटीमधील त्रूटी दुर करण्यासाठी “P5” समिट बोलवण्याचा प्रस्ताव आहे. मीडियाशी बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय कायदा कागदावर अजूनही ‘डी ज्यूर’ होऊ शकतो. परंतू वास्तविकतेमध्ये हा कायदा ‘डी फॅक्टो’ गायब झाला आहे.

आंतरराष्ट्रीय कायदा संपला

ते म्हणाले की जग अशा उंबरठ्यावर पोहचले आहे की जेथे कोणत्याही देशाकडून निश्चित केलेले नियम पाळण्याची आशा करणे शक्य नाही. कारण त्या सिद्धांतांना आता स्पष्ट पणे डिफाईन केले जाऊ शकत नाही. पेसकोव्ह म्हणाले की आम्ही ते सर्व गमावले आहे ज्यास आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा म्हणतो. आणि ते पुढे म्हणाले की प्रादेशिक भांडणाचे एकूण प्रकरण आता अशा वळणावर पोहचले आहे की ज्याचे गंभीर आर्थिक आणि राजकीय परिणाम होतील.

रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या दरम्यान उच्च स्तरिय बैठकीचा प्रस्ताव वास्तविक पुतिन यांनी कोरोना साथीच्या आधी ठेवला होता. मात्र मॉस्कोचे म्हणणे असे आहे की सध्याच्या अस्थिरतेमुळे अशी चर्चा जगभरात गरजेची बनली आहे.

P-5 देशांची बैठक बोलवण्याची मागणी

मध्य पूर्वेतील न सुटलेल्या मुद्द्यांनी एक असे अस्थिर वातावरण तयार केले आहे. जे सध्याचा इंटरनॅशनल फ्रेमवर्क सांभाळण्यासाठी संपूर्णपणे अपयशी ठरले आहे असे पेसकोव्ह यांनी म्हटले आहे. राजनैतिक दबाव आणखी वाढवत, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी वॉशिंग्टनला त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल पारदर्शक राहण्याचे आवाहन केले.

एका वेगळ्या टेलिव्हिजन कार्यक्रमात, लावरोव्ह यांनी सुचवले की अमेरिकेने त्यांच्या अलीकडील कृती एकेकाळी जागतिक राज्यव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या नियमांशी कशा जुळतात हे स्पष्ट करावे. जर जुने नियम आता लागू होत नसतील, तर आंतरराष्ट्रीय समुदाय हे जाणून घेण्यास पात्र आहे की अमेरिका त्यांच्या जागी काय आणण्याचा विचार करीत आहे असाही त्यांनी युक्तिवाद केला आहे.

Follow Us
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?