AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केले, शेजारील देशांशी माफीच्या मुद्यावर काय म्हणाले इराणी राष्ट्राध्यक्ष ?

पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धाचा हा दुसरा आठवडा सुरु आहे. इस्राईनने इराणच्या अनेक भागात ताजे हल्ले केले आहेत. आणि तेहराण हादरला आहे. या संघर्षात आतापर्यंत १,३३२ इराणी नागरिकांनी त्यांचे प्राण गमावले आहेत.

माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केले, शेजारील देशांशी माफीच्या मुद्यावर काय म्हणाले इराणी राष्ट्राध्यक्ष ?
Iran's President Masoud Pezeshkian (1)
| Updated on: Mar 08, 2026 | 7:18 PM
Share

पश्चिम आशियात सुरु असलेल्या भीषण युद्धादरम्यान आता इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे एक मोठे वक्तव्य समोर आहे. रविवारी त्यांनी स्पष्ट केले तर माझ्या अलिकडच्या वक्तव्याला शत्रूंनी चुकीच्या प्रकारे तोडून अर्धवट प्रसिद्ध केले. मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे की शत्रू देश अशी चाल खेळत आहेत ज्यामुळे जगाला वाटेल की इराणचे त्यांच्या शेजारच्यांशी युद्ध सुरु आहे, वास्तविक इराणला सद्भाव आणि भाईचारा हवा आहे.

इराणच्या सरकारी टीव्हीशी बोलताना पेझेश्कियान म्हणाले की आम्ही वारंवार स्पष्ट केले आहे की शेजारील देशांना आम्ही बंधू मानतो आणि आमचे त्यांच्याशी चांगले नाते व्हायला हवे. परंतू हल्ल्याचे उत्तर देण्यास आम्ही मजबूर आहोत, परंतू याचा अर्थ हा नाही आमचा कोणा शेजारील देशाशी वाद आहे. आणि त्यांच्या लोकांना नाराज करु शकत नाही.

माफीच्या वक्तव्यावरुन वाद, ट्रम्पना उत्तर

वास्तविक काही दिवसांपूर्वी पेझेश्कियान यांनी त्या आखाती देशांशी माफी मागितली होती, जे इराणी हल्ल्याने प्रभावित झाले आहेत. ते म्हणाले होते की मी व्यक्तीगत रुपाने त्या देशांची माफी मागतो ज्यांना आमच्या कारणाने नुकसान झाले आहे. याच सोबत त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मागणीला फेटाळून लावले, ज्यात ते म्हणाले होते की विना शर्त आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. पेझेश्कियान यांनी यास ट्रम्प यांचे स्वप्न म्हटले आहे.

पेझेश्कियान यांनी हे देखील सांगितले की इराणच्या अस्थायी नेतृत्व परिषदेने शेजारील देशांवर हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.परंतू यासाठी एक अट ठेवली आहे. इराणवर त्या देशाच्या जमिनीवरुन कोणताही हल्ला व्हायला नको. मात्र, या निर्णयावर इराणमधील काही कट्टरपंथीय गट्टांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष कार्यालयाला हे स्पष्ट करावे लागले की इराणी सैन्य कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देईल.

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले की वॉशिंग्टन आता इराणशी कोणतीही चर्चा करण्याच्या मुडमध्ये नाही. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की जर इराणी नेतृत्वाचा ढाचा कोसळला तर त्यांच्याशी बोलण्याची काही गरजच लागणार नाही. ट्रम्प यांनी हे सांगितले की तेहरान अमेरिकेसाठी मोठा धोका बनला होता.तो अणूबॉम्ब बनवण्याच्या एकदम जवळ पोहचला आहे. मात्र, याचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही.

Follow Us
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार